The Scapegoat (द स्केपगोट)
-
The Scapegoat (द स्केपगोट)
|
|
Price:
675
|
Front Cover
|
Back Cover
|
|
आता माझं नाव जॉन होतं आणि ते जीन कधीपासून झालं, याचा विचार माझ्या मनात आला. कदाचित तो माणूस मला कुठेतरी ओळखणारा असावा. मी त्याला ओळखावं अशी त्याची रास्त अपेक्षा दिसली. त्याला नाराज करणं माझ्या जिवावर आलं आणि मी फ्रेंचमध्येच म्हणालो 'असाच चाललो होतो इथून. आज रात्री मी परत चाललोय.' तो कोण होता, देव जाणे!
'तुझी आजची भेट फुकट गेली असेल?' तो म्हणाला, 'पण तू घरच्यांना मात्र सांगशील की ती कामाला आली ?'
हा भलताच आरोप होता माझ्यावर. त्याला कशानं वाटलं, की माझी सुट्टीतली भेट फुकट गेली म्हणून ? बाकी माझा मूड खराब होता ही गोष्ट खरी होती. पण
मी एक अपयशी माणूस होतो. ही गोष्ट त्याला कशी काय कळली ? मग माझ्या लक्षात आलं, की तो एक परका माणूस होता. मी त्याला यापूर्वी कधीच
बघितला नव्हता. मी नम्रपणानं झुकलो आणि म्हणालो, 'आय बेग युवर पार्डन. मला वाटतं आपला दोघांचाही काहीतरी गैरसमज झालाय.' पण उलट तो चक्क हसला व त्यानं मला डोळा मारला. मी चकित झालो. 'ठीक
आहे बाबा. आपण भेटलोच नाही असं समज. पण पॅरिसमध्ये करता येण्यासारख्या गोष्टी तू इथे मध्ये कशाला करतो आहेस ? हरकत नाही, आपण नाहीतरी पुढच्या रविवारी भेटतोच आहोत! तर तेव्हा उत्तर दे. ठीक आहे?' आणि त्यानं क्लचवर पाय दाबला आणि तो निघालादेखील. जातानादेखील तो हसतच होता.