Nivdak Chin.Tra.Khanolkar : Nakshtra Dena (चिं. त्र्यं. खानोलकर यांचे निवडक साहित्य: नक्षत्र देणं)
-
Nivdak Chin.Tra.Khanolkar : Nakshtra Dena (चिं. त्
|
|
Price:
1,100
|
Front Cover
|
Back Cover
|
|
मराठी साहित्यविश्वात एक अनाम पक्षी थोडाच वेळ फांदीवर बसला आणि उडूनही गेला. पण त्या पक्ष्याने अंत:करणातील सूर आळवले. त्या सुरांमुळे सर्व भावविश्व ढवळून निज्ञाले, इतकी त्या सुरातील आर्तता विलक्षण होती. त्या सुरांनी सर्व साहित्यविश्व गंधित झाले. ते सूर आजही विसरले गेलेले नाहीत. त्या सुरांची मोहिनी आजही सर्वांच्या मनात कायम आहे. आणि त्याने दिलेले 'नक्षत्रांचे देणे' आजही कायमस्वरूपी मनी वसलेले आहे. हा अनामपक्षी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून कोकणाने महाराष्ट्राला दिलेले एक तेजस्वी रत्न ! चिं. त्र्यं. खानोलकर - आरती प्रभु ! त्यांची साहित्यातली काही 'निवडक नक्षत्रे', त्यांच्या काही साहित्यकृतींद्वारे आपल्यासमोर ठेवत आहोत. मनात कृतज्ञतेची भावना दाटून येत आहे "गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणेमाझ्यापास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने..." --- डॉ. माधवी वैद्य