Mossad...
-
Mossad...
|
|
Price:
499
|
Front Cover
|
Back Cover
|
|
Mossad Israeli Gupther Sansthela Baladhya Banvnarya Atyant Gupt Mahatvpurn Thararak Mohima
( Marathi Edition ) मोसाद इस्त्रायली गुप्तहेर संस्थेला बलाढ्य बनवणाऱ्या अत्यंत गुप्त, महत्त्वपूर्ण थरारक मोहिमा !
मोसाद या पुस्तकात मोसादने पार पाडलेल्या गोपनीय मोहिमांचे वर्णन केले आहे. या मोहिमा मोसादच्या विकासामध्ये त्याचे स्वरूप निश्चित करणाऱ्या महत्त्वपूर्ण घटना ठरल्या आहेत. १९७२च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या इस्रायली खेळाडूंची 'ब्लॅक सप्टेंबर' संघटनेच्या अतिरेक्यांनी हत्या केली. या अतिरेक्यांचा माग काढत त्यांना एकेक करून संपवण्याची मोहीम, इस्रायलच्या गुप्तपणे राबवण्यात येणाऱ्या अण्वस्त्र कार्यक्रमासाठी 'येलोकेक' युरेनियमचा साठा हस्तगत करण्याची मोहीम आणि नाझी युद्ध गुन्हेगार अॅडॉल्फ आईकमन याचे अपहरण करत त्याचा जाहीर न्यायनिवाडा घडवून आणण्याची मोहीम अशा महत्त्वपूर्ण मोहिमांचे वर्णन या पुस्तकात केले आहे. मोसादच्या काही मोहिमा वादग्रस्तही ठरल्या. यात इराकच्या अणुऊर्जा कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या एका शास्त्रज्ञाची हत्या घडवून आणण्याची मोहीम आणि एडवर्ड स्नोडेनप्रमाणे एक प्रमुख जागत्या (विसलब्लोअर) असलेला -इस्रायली नागरिक मोर्डेकाई वानुनु याचे अपहरण या मोहिमांचा समावेश होतो मोर्डेकाई वानुनु यांना इस्राईलने बेइमान, गद्दार ठरवले. या मोहिमांवर जगभरातून नैतिक प्रश्नचिन्हे उठली. एकूणच या पुस्तकात वर्णन केलेल्या मोसादच्या मोहिमा त्याची वैशिष्ट्ये, कल्पकता आणि धाडस यांचे अचूक वर्णन करतात. त्याच वेळी त्या मोहिमांमध्ये अंतर्भूत असलेल्या वादग्रस्त नैतिक पैलूंनाही वाचकांसमोर मांडतात.