Alguj (अलगूज)
-
Alguj(अलगूज )
|
|
Price:
270
|
Front Cover
|
Back Cover
|
|
हा कथासंग्रह आपल्या हाती देताना मला मनापासून आनंद होत आहे. माणूस आयुष्यात भावनांवर जगत असतो. प्रत्येकाच्या आयुष्याचा आकृतिबंध त्याला येणारे अनुभव आणि मनात उमटणाऱ्या, त्यात गुंतलेल्या भावना यांवर अवलंबून असतो. आयुष्याच्या पटलावर ह्याच भावभावनांच्या रंगाने माणूस चित्र रेखाटत राहतो. प्रेम ही सगळ्यात सुंदर भावना. उदात्त भावना. स्त्री-पुरुषांमधील प्रेमभावना ही मला नेहमीच एखाद्या काव्यासारखी वाटली आहे. ती उदात्त असते. सुंदर असते आणि त्याहीपेक्षा हळवी अलवार असते. प्रेमाने जग जिंकता येते, हे खरं असलं तरी प्रत्येकाला जग नाही जिंकता येत. अव्यक्त राहिलेले प्रेम, अपूर्ण राहिलेली स्वप्ने हा मग जीवनाचा एक हळवा भाग होऊन जातो. अतृप्तीचा आणि आठवणींचा एक झरा काळजात आयुष्यभर पाझरत राहतो. साफल्यात जगण्याचा आनंद असतो, तर अशा अपूर्णतेतही जगण्याची कविता सापडते. अशा काही कविता म्हणजेच या कथा आहेत. आयुष्याच्या प्रवासात काही नाती निसटतात आणि काही परत भेटतातही. निसटलेल्या नात्यांमुळे दोन जिवांच्या आयुष्यात पडणारे अंतर एका जन्माचे असते. ते 'जन्मांतर' असते, तर कधी भेटलेल्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या नात्यातून 'स्वप्नांचा गाव' उभा राहतो. कधी जोडीदाराची 'प्रतीक्षा' हेच फक्त आयुष्य उरतं, तर कधी पुन्हा गवसलेल्या नात्यांची 'गिफ्ट' ही मिळते. कधीकधी नाते पुन्हा नव्याने उमलायला 'उत्तररात्र' लागते. मनात वर्षानुवर्षे रंगवलेला 'संसार' कधी दोन दिवसांसाठी का होईना जगता येतो.