Baaijjat Bari (बाइज्जत बरी)
-
Baaizzat Bari ?
|
|
Price:
350
|
Front Cover
|
Back Cover
|
|
एखाद्या देशातील काही लोकांना केवळ त्यांच्या धर्मामुळे लक्ष्य केलं जातं आणि त्यांच्याबाबतीत सरकार आणि जनता पूर्वग्रहाने वागते, असे असेल तर त्या देशाची लोकशाही अपूर्ण आहे. अशाने लोकशाही मॉडेलमध्ये मोठी त्रुटी असल्याची जाणीव मला होते. अशा स्थितीत देशातील सजग प्रसार माध्यमांनीआपल्या वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन सदर मुद्दे हाती घ्यायला हवेत. मात्र दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर प्रथमच प्रसार माध्यमेच स्वतः समस्या होऊन बसली आहेत.तुम्ही आणि मी घरात बसून कल्पनाही करू शकणार नाही आणि नखशिखान्त हादरुन जाऊ असे काही प्रसंग या पुस्तकात वाचायला मिळतात.
- अभिसार शर्मा, ज्येष्ठ टीव्ही पत्रकार
राजकीय पक्षांना आरसा दाखवणारा एक भक्कम दस्तावेज म्हणून मीया पुस्तकाकडे बघतो आहे. जागरुक समाजाची भूमिका कशी असावी याबद्दल हे पुस्तक भाष्यकरतं.
- अबू बकर सब्बाक, वकील, सर्वोच्चन्यायालय
या पुस्तकातील प्रत्येक दस्तावेज ही कहाणी सांगतो :वर्षानुवर्षे तुरुंगवास, दहशतवादाचा कलंक, प्रत्येककेसमध्ये एक नव्हे तर अनेक आयुष्यं उद्ध्वस्त होणं. देशाची सद्यस्थिती या पुस्तकात दिसून येतेच शिवाय या सगळ्याची जबाबदारी कोणत्या एका राजकीय पक्षाची नसून, सगळ्यांचीच आहे हे सांगते. निरपराध माणसांना दहशतवादाच्या नावावर भोगावीलागणरी शिक्षा अल्पसंख्याक माणसांना गुन्हेगार ठरवणाऱ्या एका विचारसरणीकडे निर्देशकरते. हे पुस्तक आणि त्यामागचे कष्ट आजच्या काळासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. आपल्याविचारसरणीशी आपल्याला लढावं लागणार असल्याची ही हाक आहे, आणिती काही केवळ एका समुदायासाठी अथवा धर्मासाठी नव्हे, तरआपल्या सगळ्यांसाठीच आहे.
- हरतोश सिंह बाल, राजकीय संपादक, कारवाँमॅगझीन