Shreeganesha (श्रीगणेशा)
-
Shreeganesha
|
|
Price:
120
|
Front Cover
|
Back Cover
|
|
गंगीला पदर येऊन ती मकरात बसली तेव्हापासून या खडकलाटेचे डोळे तिच्याकडं लागून आहेत. तिच्या रूपाची पडलेली भूल अजून तशीच आहे; कारण गंगीचं अंग चांगलं उफाड्याचं आहे आणि थोरवड अंगाच्या ह्या गंगीचं कातडंही हळदीगत गोरंपान आहे. तिच्या नाकाचा शेंडा जरासा खुडल्यागत दिसतो; पण तेच नाक तिला शोभून दिसतं असं तिथल्या तरुण पोरांचं मत आहे. तिच्या गो-या गालावर डाव्या बाजूला एक हिरवा तीळ आहे, तो तिला पाहणा-याच्या मनावर ठसल्याशिवाय राहत नाही. तिच्यासारखा वाकडा भांग गावातल्या दुस-या कुठल्या पोरीनं अजून काढला नाही, अनेक कुभांडं त्या गावानं तिच्यावर रचली आहेत. तिच्यासारखे कानावर फुगे पाडणारी पोर त्या गावात निपजायला अजून किमान दहा वर्षं तरी जावी लागतील !