The Dark Crusedar ( द डार्क क्रुसेडर)
-
The Dark Crusedar
|
|
Price:
240
|
Front Cover
|
Back Cover
|
|
इंग्लंडने एक अभिनव क्षेपणास्त्र तयार करायला घेतले. कारण एका नव्या इंधनाचा शोध लागला होता..... पण त्यांचे शास्त्रज्ञ एकामागोमाग एक गायब होऊ लागले, आपापल्या पत्नींसह !....
कुठेतरी या प्रकल्पाची माहिती झिरपू लागली होती. सारे गुप्तहेरखाते त्रासून गेले..... ती एक मोठी योजना होती. एका शत्रुराष्ट्राची योजना. त्यांना जगावर वर्चस्व हवे होते. ते त्या क्षेपणास्त्रपर्यंत पोहोचू पाहत होते. सर्व काही जमत आले.
परंतु क्षेपणास्त्राला फ्यूज घालता येत नव्हता.
एक शास्त्रज्ञ त्याचवेळी दूरवरच्या बेटावर पोहोचला. त्याने छडा लावायचा प्रयत्न केला अन् नंतर जो धमाका उडाला तो थरारक भाग वाचताना अंगावर काटे उभे राहतात.....
क्षेपणास्त्र, बोटी, हेरगिरी, भावी अणुयुद्धे आणि जगावर सत्ता गाजवण्याची लालसा, एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर ऍक्शन व थरारक घटना जन्म घेणारच. या कठोर पार्श्वभूमीवरती एक नाजूक प्रेमप्रकरण फुलत होते...
ऍलिस्टर मॅक्लीनच्या या कादंबरीचा तेवढाच सरस अनुवाद आपल्यासाठी सादरक रीत आहोत.