Rajai ( रजई )
-
Rajai
|
|
Price:
170
|
Front Cover
|
Back Cover
|
|
मी बर्याच कथा लिहिल्या आणि कुठलीही कथा परत आली नाही. एकीकडून मला विरोध होऊ लागला, पण दुसरीकडून मासिकांतर्फे होत असलेली कथांची मागणीही वाढू लागली. मग मी विरोधाची काहीच पर्वा केली नाही. मी `रजई’ लिहिली, तेव्हा मात्र बॉम्बस्फोट झाला. साहित्यिक आखाड्यात माझ्या चिंधड्या उडाल्या. काही लोकांनी मात्र माझ्या समर्थनार्थही लेखणी चालवली.
तेव्हापासून माझ्यावर अश्र्लील लेखिका असल्याचा ठसा मारला गेला. `रजई’च्या आधी आणि `रजई’च्या नंतर मी जे काही लिहिलं, त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. मी लैंगिक विषयांवर लिहिणारी अश्र्लील लेखिकाच ठरले. अगदी आता आता गेल्या काही वर्षांपूर्वी नव्या पिढीने मला सांगितलं की, मी `अश्र्लील लेखिका’ नसून `वास्तववादी लेखिका’ आहे. मी भाग्यवान आहे की, माझ्या जिवंतपणी मला समजून घेणारे जन्माला आले. मंटोला तर वेडं ठरवलं गेलं. प्रगतिशील लेखकांनीही त्याला साथ दिली नाही. प्रगतिशील लेखकांनी मला ना ठोकरलं, ना डोक्यावर घेतलं. मंटो धुळीत मिसळला, कारण पाकिस्तानात तो कंगाल होता. मी पुष्कळच चांगल्या आर्थिक स्थितीत होतो. चित्रपटांमधून आम्हांला बर्यापैकी कमाई होत होती आणि `साहित्यिक मृत्यू वा जीवन’ यांची पर्वा नव्हती.