-
Sarwasakashi (सर्वसाक्षी)
मरणाच्या काही घटका अगोदर त्याने मला उद्देशून जे अखेरचे पत्र लिहिले होते त्याचा शेवट साहित्यिकाला साजेसा केला होता. तो नावाने पवन गायकवाड होत. परंतु नदीकाठच्या सामान्य धोंडयाइतकीच आपली लायकी असल्याचे त्याने सूचित केले होते. गो. नी दांडेकरांना कल्पनाही आली नसती की आपल्या एका कादंबरीच्या नावाचा अशा प्रकारचा उपयोग कधी काळी कोणी करील! गायकवाडने तसे करून दाखवले होते! आपल्या लहानशा आयुष्यात त्याने म्हटले तर पुष्कळ काही केले म्हटले तर काही केले नाहीही! त्याने केले असेल नसेल. पण सर्वांचा साक्षीदार मात्र मला करून ठेवले होते.