-
Te Don Kshansuddha (ते दोन क्षणसुद्धा...!)
आपल्या हातात फार वेळ नाही उरलेला हे माहिती असताना उरल्यासुरल्या दिवसांना आनंदाचं तोरण लावण्यासाठी धडपडणारी एक तरुण मुलगी .. पोटच्या पोरीचा हा विलक्षण हतबलपणे पाहत तिच्यामागे पहाडासारखी उभी राहिलेली आई .. आणि दोघींमधला एक करुण लपंडाव . मृत्यू काही पावलांवर आहे .. आहेच ...हे दोघींनाही माहिती ! पण ना हिने तिला सांगितलेलं, ना तिने हिला ! मुलीच्या मृत्यूनंतर अवघ्या दोनच दिवसांनी आईला एक खाजगी डायरी सापडते ... तिच्या मुलीची ! शरीरात शिरलेल्या चिवट व्याधीचा डंख क्षणाक्षणाने कुरतडत असताना लिहिलेली... मृत्यूच्या मिठीत खेचत नेणाऱ्या प्रत्येक दिवसातला क्षण -न-क्षण जिवंत उभा करणारी डायरी ! हवंहवंसं आयुष्य कणाकणाने हातातून निसटतंय याची खोल जाणीव असलेल्या या खळबळत्या वादळात काय नाही ? छोट्या लढायांमधल्या विजयाचा अहानंद , मोठया युद्धातल्या पराभवाचे डंख , जखमा बांधत नेणारा नर्म विनोद आणि हातून सगळं सुटताना गवसलेलं तत्वज्ञानही ! .... हे सगळं लिहिणारी गौरी आज असती ,तर तीस वर्षाची असती . तिचा डाव अर्ध्यावर मोडला हे खरं ; पण ती जे जगली, त्यातला कणही तिच्याहून दुप्पट आयुष्य मिळालेल्यांचा वाट्याला येत नाही अनेकदा !! आज वाटतं, तेव्हाच का नाही मी थोडं जास्त बोलले तिच्याशी ? तेव्हाच का नाही तिच्या समृद्ध मनाच्या विहिरीत थोडी आत उतरून तिला आणखी घट्ट भेटले का नाही ? .....का ?