-
Ghei Chhand (घेई छंद)
अर्ध्या तपात दृष्टीपूर्ण तपश्चर्या, भगीरथ प्रयत्न करून उत्तमोत्तम कलाकृती आपल्यासारख्या आस्वादकांसमोर ठेवणे ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. • मुख्यत: भारतीय संगीताने आयुष्य व्यापून टाकणे. • उच्च प्रातिभ संगीत नाटकाचं दिग्दर्शन करणे व त्यात भूमिका करणे. • बालगंधर्व ही व्यक्तिरेखा साकारणे. • या पार्श्वभूमीवर लोकमान्यांसारखी जाज्वल्य भूमिका साकारणे. • ...आणि या सगळ्याचा कळसाध्याय म्हणजे एका उच्च प्रातिभ संगीत नाटकावर आधारित चित्रपट करणे. अशा गोष्टी आयुष्यात केवळ योगायोगाने घडत नाहीत तर त्या विचारपूर्वक कष्टसाध्यही असतात हे प्रतिबिंबित करणाऱ्या या ‘कट्यार’ संगीत नाटक ते ‘कट्यार’ चित्रपट या रोमांचकारी प्रवासाची कहाणी... लेखकाची भूमिका प्रथमच साकारणाऱ्या सुबोधच्याच शब्दात; या प्रवासातील भूमिका, दृष्टिकोन, आव्हानं, आठवणी यांचे दृष्टीपूर्ण दस्तावेजीकरण...