-
kan kan Shan Shan (कण कण क्षण क्षण)
कण कण क्षण क्षण या पुस्तकामध्ये साहित्यिका: गिरिजा कीर यांच्या जीवनातील काही सकारात्मक आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत.
-
Changlya Chalicha Manus
भारतीय चित्रपटाच्या सुवर्णकाळात दत्ता कोरेगावकर यांचे नाव संगीतकार म्हणून अग्रणी होते. विद्यार्थी असल्यापासूनच त्यांना संगीताची गोडी लागली. वेगवेगळी गीते, श्लोक, यांना चाली लावण्याचा छंद त्यांना जडला. त्यातूनच त्यांच्यातील संगीतकार घडत गेला. १९३८ पासून त्यांची कारकीर्द सुरु झाली. बारा मराठी चित्रपट व १८ हिंदी चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. त्यांचे चित्रपट कमी असले तरी त्यांच्या संगीताचा दर्जा अत्यंत श्रेष्ठ होता; पण तरी त्यांच्या वाट्याला काहीशी उपेक्षा आली. लोकांसमोर त्यांचे नाव, सांगीतिक कार्य गिरिजा कीर यांनी 'चांगल्या चालीचा माणूस' मधून आणले आहे. त्यातून एका श्रेष्ठ संगीतकाराचा जीवनप्रवास आपल्या समोर येतो..