-
Mumbai After Ayodhya (मुंबई आफ्टर अयोध्या)
गेल्या तीन दशकांत मुंबईने जे अनपेक्षित असे पाहिले, भोगले, अनुभवले त्याचा दस्तऐवज म्हणजे हे पुस्तक. अयोध्या घटनेनंतर माफिया जगतातील घडामोडींनी समाजकारण आणि राजकारणही बदलले. सोबतच मुंबईचे भौगोलिक रूपदेखील बदलले. नवीन उपनगरांची आणि वस्त्यांची निर्मिती झाली. शहर दंगलीतून बाहेर पडून नि:श्वास सोडत नाही, तोच पुन्हा २००२मध्ये झालेली बॉम्बस्फोट मालिका आणि २००८मधील २६/११चा दहशतवादी हल्ल्यामुळे हिंसेने परमोच्च सीमा गाठली. जीतेंद्र दीक्षित हे याच शहरात जन्माला आले आणि इथेच वाढले. ज्या तीन दशकातील घडामोडींबद्दल त्यांनी वर्णन केले आहे, त्यातील बराच काळ त्यांनी स्वत: अनुभवला आहे. त्यांचे हे पुस्तक म्हणजे जणू मुंबई शहराची आत्मकथा. गिरण्यांचे शहर ते मॉलचे शहर झालेली मुंबई, इथे गगनचुंबी इमारती वैÂक पटींनी वाढल्या. शहराची जीवनवाहिनी असणारी लोकल ट्रेन लांबीने वाढतच गेली, तरीही गर्दीला सामावून घेणे, मुंबईला अवघड जात आहे. जगातील सर्वांत मोठं सिनेजगत असणारं बॉलिवुडही या विळख्यातून सुटले नाही. इथं चित्रपटकारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. येथील पारंपरिक, ऐतिहासिक गणेशोत्सव आणि दहीहंडीसारखे उत्सव भक्तिभावरहित झाले आहेत आणि त्यांचे व्यापारीकरण झाले आहे. अत्यंत महत्त्वाचे घटनाक्रम, शहराला मुंबई म्हणून घडवणार्या लोकांची माहिती आणि मुंबईच्या व्यक्तिमत्त्वातील बदलाचे वर्णनही या पुस्तकात अनुभवास येते. शहराची भौगोलिक स्थिती, नागरी समस्यांचा चढता आलेख, गजबजलेले अर्थकारण, रिअल इस्टेटचा बुजबुजाट आणि राजकारणाची शंभर शकले, असे सगळे एकत्रित वाचायला मिळते.
-
Zero Day (झिरो डे)
मुंबई शहरात प्रचंड गोंधळ माजला आहे. शहराच्या रस्त्यावरील सर्व ट्रॅफिक सिग्नल बंद पडले आहेत. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे मुख्य शाहवाझ अली मिर्झा यांच्या कार्यालयीन ई-मेलवर आलेल्या इमेलमध्ये या सायबर हल्ल्याची जबाबदारी मुन्तकिम नावाच्या अतिरेक्याने घेतली आहे. त्याने आणखी हल्ल्यांची धमकी दिली आहे. मिर्झांसह सायबर गुन्हे शाखेचे आयजी विक्रांत सिंग, राष्ट्रीय सुरक्षा बलाची मेजर शायना वर्मा आणि इतर तिघे लगेच सायबर जगताच्या काळोख्या गुन्हेगारी जगतात शोध घेऊ लागतात. पण हॅकरला घेरण्यासाठी मिर्झा आणि विक्रांत यांनी खेळलेली खेळी उलटी पडते. परिणामी शहरावर आणखी एक सायबर हल्ला होतो आणि तोही मुंबईची जान असलेल्या रेल्वे सेवेवर! झिरो डेचे संकट संपूर्ण देशाच्या यंत्रणेला कोसळवू शकते. मिर्झा आणि विक्रांत झिरो डेमध्ये त्यांचे आयुष्य पणाला लावून या महाभयंकर अस्त्राचा सामना करण्यास सज्ज आहेत.
-
Auchwitz Cha Photowala (ऑशविट्झचा फोटोवाला)
"जर्मनीतील सामूहिक हत्याकांडाच्या केंद्रस्थानी घडणारी ही धाडसी आणि आशावादी कथा आहे. जर्मनीने १९३९ मध्ये पोलंड वर विजय मिळवला. तेव्हा विलहेम ब्रेस याला हिटलर गोटात सामील होण्याचा आदेश करण्यात आला. त्याने तो नाकारला. मग त्यानंतर राजकीय कैदी नंबर ३४४४ म्हणून त्याला अशविट्झच्या छळछावणीत पाठवण्यात आले. शुट्झशाफेलनी त्याला छावणीतील आतील कामाचा लेखाजोखा मांडण्याचे काम दिले. छावणीत येणाऱ्या कैद्यांचे फोटो घेण्यापासून त्याने कामाला सुरवात केली आणि कालांतराने जोसेफ मेंगल यांनी गुन्हेगारांवर केलेले वैद्यकीय प्रयोग आणि प्रत्यक्ष कैद्यांच्या कित्येक फाशी नोंदवण्यापर्यंत त्याने काम केले. १९४० ते १९४५ दरम्यान, ब्रेसने त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या भयानक घटनांचे ५०,००० फोटो घेतले. तसे फोटो काढत बसण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. पुढे पुढे त्या कॅमेराच्या मागे लपून राहणे ब्रेसच्या विवेक बुद्धीला पटेना. सुरवातीला तो छावणीतील रहिवासी चळवळीत सहभागी झाला. कैद्यांची खोटी कागदपत्रे तयार करणे, या छावण्यांमध्ये काय चालू आहे हे बाहेरच्या जगाला कळावे म्हणून आटले फोटो बाहेर पाठवणे अशा गोष्टी तो या चळवळीतून करू लागला. नंतर शेवटी सोव्हिएत सैनिक आले तेव्हा शुट्झशाफेलनी ब्रेसला ते फोटोग्राफ नष्ट करण्याचे आदेश दिले. ते आदेश नाकारत ब्रेस म्हणाला, `कारण ,जगाला हे कळलं पाहिजे`. "
-
Never Marry A Woman With Big Feet (नेव्हर मॅरी अ व
स्त्रीचा देह असो वा आत्मा..जगभरच्या म्हणींनी या स्त्रीरूपाचे नानाविध अविष्कार सादर केले आहेत. या म्हणींमधून स्त्रियांचं सामाजिक स्थान अधोरेखित होतं. याचं सखोल चिंतन आणि २४५ भाषांमधील स्त्रीविषयक म्हणी आणि त्यांची विश्लेषणे या पुस्तकात समाविष्ट आहेत. लेखिका मिनेक शिप्पर यांच्या अतिशय रंजक व टीकात्मक संकलन शैलीमुळे जगाच्या कानाकोपऱ्यांतील शाश्वत तरीही सतत विकसनशील असलेल्या म्हणींमधून स्त्री व पुरुष दोघेही किती विकसित झाले आहेत, याची एक ढोबळ आकृती वाचकांसमोर स्पष्ट होते.