-
Ajanma(अजन्मा)
एक सोशल वर्कची पदवी घेतलेली मुलगी सरकारी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगविभागात नोकरीला लागते आणि तिला या समाजाचे विदारक दर्शन होत राहते. त्याला भिडावे लागते. गरीबी, अगतिकता, लाचारी, लबाडी या सर्वाला सामोरे जावे लागते. एका भाबड्या, संवेदनशील मुलीचा एका प्रबुद्ध आणि जबाबदार स्त्रीकडे होणारा हा एक प्रवास. आजच्या काळातसुद्धा आद्य स्त्री लेखिका मालतीताई बेडेकर यांच्या जवळ जाणारा आणि म्हणूनच अस्वस्थ करणारा!