-
Ek Aatpat Nadi Hoti (एक आटपाट नदी होती)
नदीचे सर्व सजीवांमध्ये असलेले महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. त्यातही मानवी जीवनात असलेले स्थान हे कधीही पुसता न येण्यासारखे आहे. तिने मानवासाठी दिलेले योगदान हे मोठे आहे. पण गेल्या काही वर्षात या नद्यांना नजर लागली. नागरीकरण आणि औद्योगिकरण यात या नद्यांचे अपरिमित नुकसान झाले. त्यामुळे एकेकाळी नितळ, स्वच्छ वाहणारी आता गटारगंगा म्हणून वाहू लागली. पण आता नदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी तुमच्या सारख्या लहानग्यांची साथ या पुढील काळात लागणार आहे. 'नदी वाचवा' हि हाक आता पुढच्या काळात अधिक तीव्रतेने तुम्हाला ऐकू येईल. नदी हि आपल्या पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग आहे हे आपल्या लक्षात अजूनही आलेले नाही. या नद्यांचे वास्तव आणि त्यांचे संवर्धन हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण नद्या वाचवू शकत नाही. त्यामुळेच उद्याचे नागरिक म्हणून तुमची जबाबदारी हि जास्त आहे. हाच सांगावा घेऊन नदी सांगत्येय तिची कहाणी.
-
Maharashtracha Safarnama (महाराष्ट्राचा सफरनामा)
सारेच महाराष्ट्राच्या प्रेमात.. !! महाराष्ट्र हे नाव जरी नुसते उच्चारले, तरी आपण पर्यटनाच्या वेगळ्याच विश्वात जातो. या विश्वात इतिहास, भूगोल, सह्याद्री, मंदिरे, नद्या, जंगले, गड-किल्ले, समुद्रकिनारे, स्मारके, संग्रहालये, गावे, या साऱ्या गोष्टी सामावल्या आहेत. पर्यटनाच्या बाबतीत महाराष्ट्राचे अवकाश खूप मोठे आहे. इतर राज्यांपेक्षा कांकणभर अधिक सरस आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा विविध भागांतली संस्कृती आणि वेगळेपण हासुद्धा एक अनुभवायचा भाग आहे. या राज्याला लाभलेला शिव-छत्रपतींचा इतिहास तर कळसबिंदू ठरावा. कितीतरी गोष्टींनी महाराष्ट्र समृद्ध आहे. एक जन्मसुद्धा अपुरा पडेल हे सारे डोळे भरून पाहायला. संपूर्ण महाराष्ट्र हा पर्यटनाच्या बाबतीत एका पुस्तकात कधीच मावणार नाही. या पुस्तकात विविध भागांतील निवडक ठिकाणांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्राचा हा सफरनामा निश्चितच तुम्हाला आवडेल.
-
Bal Kumaransathi Gad Kille (बाल कुमारांसाठी गड किल
लहान मुलांना या पुस्तकात काय वाचायला मिळेल? गड-किल्ले पाहताना काय आणि कसे पाहायचे याची सचित्र माहिती. किल्ल्याच्या विविध भागांना काय म्हणतात याची विस्तृत माहिती. वैभवशाली वारसा असलेल्या किल्ल्यांचे संरक्षण आणि पावित्र्य कसे राखावे याचे विवेचन. गड-किल्ल्यांवर जाताना घ्यायची काळजी लहान मुलांना फिरता येण्याजोग्या निवडक किल्ल्यांची माहिती.