-
Ashihi Ek Jhunj (अशीही एक झुंज)
ही कहाणी आहे औषधकंपन्यांच्या नफेखोरीची! माणसाच्या जिवाशी खेळणाऱ्या राजकारणाची! वर्णद्वेषाची अन् वर्गसंघर्षाची! पण या कहाणीला दुसरी बाजूही आहे- जगातला कुणीही रुग्ण औषधाविना तडफडू नये, ‘परवडत नाही’ म्हणून त्याला उपचारापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी धडपडणाऱ्या एका भारतीय औषधकंपनीची अन् त्या कंपनीच्या ध्येयवेड्या प्रवर्तकाचीही ही कहाणी आहे. संपूर्ण आफ्रिका खंडात वणव्यासारख्या पसरलेल्या एड्सच्या विळख्यातून रुग्णांना सोडवण्यासाठी ‘सिप्ला’ या भारतीय औषधकंपनीनं दिलेली अशीही एक झुंज
-
Coronachya Krushnachhaye (करोनाच्या कृष्णछायेत)
कोरोनाचा विषाणू बघता बघताएका देशाच्या सीमा ओलांडून बाहेर पडला.सगळ्या जगावर हे सावट पसरलं.कोरोनामुळे बळी पडलेल्या मृतांची संख्या भीतीदायक होती.बुद्धिमान मानवजातीसमोर या विषाणूनं हे भयंकर आव्हान उभं केलं.हा विषाणू कुठून आला, कसा पसरला,जगभरात अनेक देश त्याचा सामना कसा करत आहेत,भारत त्याच्याशी कसा लढा देत आहे –अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा वेध घेणारंआणि त्याबरोबरच – कोरोनानंतरची बदलणारी भू-राजकीय समीकरणं,औषध-संशोधन आणि निर्मितीच्या क्षेत्रातली व्यापक होणारी आव्हानंयाचाही लेखा-जोखा मांडणारं पुस्तक!भविष्यात अशा किती लढायांना माणसाला सामोरं जावं लागू शकेल,कुणास ठाऊक? त्यामुळे या विषयाची सामान्य माणसालासोप्या भाषेत ओळख करून देणं हीच आजची सर्वात मोठी गरज!औषधनिर्मितीच्या क्षेत्रांत जवळपास दोन दशकं कार्यरत असणाऱ्याअभ्यासक डॉ. मृदुला बेळे यांनी सांगितलेलीधोकादायक विषाणू आणि चिवट मनुष्यजातीच्या संघर्षाची कहाणीकोरोनाच्या कृष्णछायेत….
-
Katha Aklechya kaydyachi (कथा अकलेच्या कांद्याची)
चोर चोरी करू शकत नाही, शासक कर लावू शकत नाही, भाऊबंदांमध्ये वाटणी होत नाही आणि तिचे ओझेही वहावे लागत नाही. अशी संपत्ती म्हणजे बौद्धिक संपदा. तरीसुद्धा तिचेही रक्षण करावेच लागते. अगदी व्यक्तिगत पातळीपासून सामूहिक अन् राष्ट्रीय स्तरापर्यंत ही सृजन संपत्ती जपावी लागते, वाढवावी लागते. ही बौद्धिक संपदा तुम्हाला देत असते विशिष्ट हक्क. पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, भौगौलिक निर्देशक, इंडस्ट्रियल डिझाइन - अशा अनेक प्रकारांनी हे हक्क तुम्हाला मिळतात. कसे मिळवायचे हे हक्क? कसे राखायचे हे हक्क? कुणी या हक्कांचा भंग केल्यास तो रोखायचा कसा? राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय कायद्यांची यात काय भूमिका असते? अशा अनेक मुद्द्यांबाबत मोलाचे मार्गदर्शन करणारे - संशोधक-उद्योजकांपासून लेखक-प्रकाशकांपर्यंत, गीतकार-संगीतकारांपासून नाट्य-चित्रपट दिग्दर्शकांपर्यंत, चित्रकार-छायाचित्रकारांपासून इंजिनीअर-तंत्रज्ञांपर्यंत, साऱ्या सर्जनशील व्यक्तींना त्यांच्या अनमोल निर्मितीचे भान करून देणारे - कथा अकलेच्या कायद्याची.