-
Nagasaki (नागासाकी)
नागासाकी ही कादंबरी म्हणजे १९४५मध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला, त्याच्या पार्श्वभूमीची, परिणामांची आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक बाबींची विस्तृत कहाणी आहे. १६ ते २९ जुलै आणि ५ ऑगस्ट १९४५ ते १० ऑगस्ट १९४५ या दिवसांतील राजकीय घडामोडींचं आणि हिरोशिमा, नागासाकीतील लोकांच्या दैनंदिन जीवनाचं चित्रण, असं सर्वसाधारणपणे या कादंबरीचं स्वरूप आहे. क्रेग कोली यांनी संशोधन करून, खूप संदर्भ अभ्यासून, प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती घेऊन ही कादंबरी सिद्ध केली आहे. जपानने पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्याचा सूड म्हणून अमेरिकेने हा बॉम्बहल्ला केला. त्या हल्ल्यानंतर या शहरांमध्ये झालेल्या मृत्यूच्या तांडवाचं आणि जखमी लोकांच्या वेदनांचं प्राधान्याने चित्रण करणारी ही कादंबरी जरूर वाचली पाहिजे.
-
Sadhane (साधने)
" माणसाचे जीवन यशस्वी व्हायचे असेल तर त्याला सगळ्यात जास्त गरज असते सकारात्मक विचारांची. सकारात्मक विचार करायची सवय स्वत:ला कशी लावायची आणि त्याप्रमाणे कृती कशी करायची, हे मानसोपचार तज्ज्ञ चांगल्या रीतीने सांगू शकतात; पण ही सकारात्मकता स्वत:मध्ये निर्माण करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ वेळोवेळी केवळ चर्चेतून रुग्णाचं समुपदेशन करत असतात. मात्र फिल स्टुट्झ या मानसोपचार तज्ज्ञाने रुग्णांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी चार साधने शोधून काढली आणि बॅरी मायकेल्स या मानसोपचार तज्ज्ञालाही त्याबाबतीत मार्गदर्शन केले. बॅरीने त्याच्या रुग्णांना या साधनांचा अवलंब करण्यास सांगितले. ती साधने कोणती, ती कधी वापरायची, कशी वापरायची, त्यांची उपयुक्तता इ. बाबत या पुस्तकात चर्चा केली आहे.या साधनांबाबत फिल स्टुट्झशी केलेली चर्चा, या साधनांचे रुग्णांवर केलेले प्रयोग आणि त्याचे आलेले अनुभव, या साधनांविषयी किंवा या साधनांशी संबंधित अन्य मुद्द्यांविषयी लोकांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि बॅरीने त्याला दिलेली उत्तरं असं सर्वसाधारणपणे या पुस्तकाचं स्वरूप आहे. सकारात्मक विचार करण्यासाठी किंवा ते मनात निर्माण होण्यासाठी "