-
Dhivarachi Aarta Saad (धीवराची आर्त साद)
धीवराची आर्त साद’ची कथा तीन कुटुंबांतील तीन मुलींभोवती फिरते. सुक्कोरिना, डॉना आणि मायोला. सुक्कोरिना गरीब, डॉना श्रीमंत आणि मायोला मध्यमवर्गीय कुटुंबातलीR. सुक्कोरिना आणि डॉनाला आई-वडिलांकडून प्रेम मिळालेलं नाही. मायोलाला ते मिळालंय, पण तिची मोठी बहीण झरेला हिच्या स्वैर वर्तनाला अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरलेले आई-वडील आणि झरेलाने केलेली आत्महत्या यामुळे समुपदेशक असलेली मायोला अस्वस्थ आहे. सुक्कोरिनाचा विवाहित पुरुषाकडून झालेला कौमार्यभंग आणि तिने केलेला गर्भपात, याचं तिच्या वैवाहिक जीवनावर पडलेलं सावट, त्यामुळे ढळेलेलं मानसिक संतुलन, प्रेमाच्या शोधात वणवण फिरणाऱ्या डॉनाचं अयशस्वी ठरलेले दोन विवाह, त्यामुळे तीव्र निराशेने (डिप्रेशन) ग्रासलेलं मन. सुक्कोरिना, डॉना आणि मायोलाचं नाट्यमयरीत्या एकत्र येणं...तिघींच्या जीवनाचा हा प्रवास अनुभवण्याजोगा आणि मन:स्पर्शी.
-
Andhalya Baiche Vanshaj (आंधळ्या बाईचे वंशज)
"हम्सा आणि अस्मा या जोडप्यांची मुलं सोडली, तर त्या दोघांचं मिळून एकत्र म्हणावं असं काहीच नाही. अमर त्यांचा सगळ्यात धाकटा मुलगा. तो त्याच्या मामासारखा दिसतो. मामा आता या जगात नाही. अमरला एक रूपगर्विष्ठ बहीण आहे, जसिरा. त्याचा अकमल नावाचा भाऊ भलत्याच मार्गाला लागलाय. कर्मठ धर्म पाळता पाळता तो अतिरेकी बनतोय. त्याच्या सोफिया नावाच्या बहिणीचा बुडून अपघाती मृत्यू झालाय. एके काळी समृद्ध असणाऱ्या या कुटुंबाला उतरती कळा लागलीय. आपल्या आयुष्याला ते तोंड कसं देतायत, तेच या कादंबरीत सांगितलंय. दोन्ही भावांचा सुन्ता समारंभ आणि जसिराची शादी सोडली, तर त्यांच्या आयुष्यात सुखाचे प्रसंग येत नाहीत. शाळेच्या दिवसांपासून अमरचा संदीप नावाचा मित्र आहे. त्याचा अमरच्या आयुष्यावर बराच प्रभाव आहे. जसिराची शादी पार पाडण्यासाठी आंधळ्या आजीला फसवून तिचं घर विकतात आणि नंतर ती अमरच्याच घरी राहायला येते. अमरचं घर आणि आसपासचा परिसर याचं तपशीलवर वर्णन येतं. तिथंच तर बहुतांश कथानक घडतं. त्यांच्या छोट्याशा गावाच्या साध्याशा जीवनाचं परिणामकारक वर्णन केलंय. जसिराच्या शादीच्या वेळी घराची साफसफाई करत असताना त्यांच्या हाती फोटो लागतात. त्यामुळे अमर आणि त्याचा मामा यांच्या आयुष्यात असणारी समानता स्पष्ट व्हायला लागते. अमरची आत्या, तिची मुलगी जसिरा, संदीप, अमरच्या वडिलांचं दुसरं कुटुंब इत्यादी उपकथानकंही आहेत, त्यामुळे अमरच्या स्वभावचित्रणात भर पडते आणि कथानकही पुढे सरकतं. शेवटी अमरचं भविष्यही त्याच्या मामासारखं ठरतं. सविसाव्या वर्षी आत्महत्या. खरं तर, सुरुवातीलाच आपल्याला शेवटाची स्पष्ट कल्पना दिलीय. तरीही कथानकाची मांडणी आणि भाषाशैली आपल्याला गुंतवून ठेवते. "
-
The Dance of Intimacy (द डान्स ऑफ इंटिमसी)
सर्वाधिक खप असणाऱ्या ‘द डान्स ऑफ अँगर’च्या लेखिकेनं ‘द डान्स ऑफ इंटीमसी’ या पुस्तकात चांगले नातेसंबंध दृढ करण्यासाठी आणि बिघडलेल्या नातेसंबंधांत सुधारणा व्हावी यासाठी कोणती छोटी छोटी पावले उचलावीत याचे विवेचन केले आहे. सख्यत्वाचे नातेसंबंध, ज्यात काही कारणामुळे दुरावा, तीव्रता किंवा दु:ख यामुळे बाधा येत असते. त्यांचे सूक्ष्म निरीक्षण करून, त्या आपल्याला ‘स्व’ची दृढ जाणीव प्राप्त करण्यासाठी आणि इतरांशी सख्यत्वाची जवळीक साधण्यासाठी नेमके कोणते बदल करावेत, याची माहिती देतात. स्पष्ट सल्ला आणि उपचारार्थींची ठळक उदाहरणे यांच्या साहाय्याने डॉ. लर्नरनी सख्यत्वाच्या नातेसंबंधांविषयीचे एक भरीव आणि उपयोगी असे पुस्तक स्त्री-पुरुषांच्या हाती ठेवले आहे. याहून चांगले पुस्तक असू शकणार नाही.