-
Drushti Aadchi Srushti (दृष्टी आडची सृष्टी)
मानवी सभ्यतेला आणि पृथ्वीतलावरच्या जीवसृष्टीला विषाणूंनी ज्या प्रकारें आकार दिला आहे, हे आता कुठे आपल्याला उमजू लागलं आहे. आपल्यापैकी प्रत्येकावर ज्या अदृश्य शक्ती परिणाम करत असतात, त्यांची भुरळ घालणारी झलक प्रणय लाल यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसते. चित्तवेधक आणि ज्ञानात भर टाकणारं!’ – सिद्धार्थ मुखर्जी, – द एम्परर ऑफ ऑल मॅलडीज या पुस्तकाचे पुलित्झर पारितोषिक विजेते लेखक. ‘आपल्यापैकी बहुतेक जण विषाणूंकडे रोगकारक सूक्ष्मजीव म्हणून पाहतात, परंतु ते निसर्गातले सर्वाधिक वैविध्य असलेले, सर्वाधिक संख्येने आढळणारे सूक्ष्मजीव आहेत, जे सजीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेवर वास करतात. वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या, सुंदर रेखाचित्रांनी सजलेल्या या पुस्तकात प्रणय लाल आपल्याला विषाणूंच्या जगताची भव्य यात्रा घडवतात आणि त्यांचा इतिहास, आणि निसर्गात ते बजावत असलेल्या विभिन्न विस्मयकारी भूमिकेचं दर्शन घडवतात. तरुण वाचकांसह, ज्यांना ज्यांना निसर्गात रस आहे, त्या सर्वांना हे पुस्तक अतिशय आनंद देईल.’
-
Ha Ye Mumkin Hai ( हा ये मुमकिन है )
बिहारमधल्या दोन वर्षाच्या कामामुळे तरूचं(लेखिकेचं) आयुष्य तर उजळून निघालंच पण ती म्हणते प्रत्येक भारतीयाने समर्पित वृत्तीने निदान वर्षभर जरी सामाजिक काम करायचं ठरवलं तर आपल देश ख-या अर्थाने सुदृढ, विकसनशील होऊ शकतो. प्रत्येक भारतीयाला 'खरंखुरं 'सोनेरी स्वप्न दाखवणारं पुस्तक....
-
Devdaranchya Chayetla Mrutyu (देवदारांच्या छायेतला
रस्किन बाँड यांच्या नवीन कथांच्या या विलक्षण संग्रहात गतकाळातल्या मसुरीत घडलेल्या रोमांचक गोष्टी आहेत. त्यात ‘खून झालेला पाद्री’, ‘विवाहबाह्य संबंध ठेवणारं जोडपं’, ‘जन्मतः दुष्ट असलेला मुलगा’, ‘बॉक्स बेडमधलं प्रेत’, ‘टपालातून आलेल्या विषाचं गूढ’, ‘कोन्यॅकमधून केलेला विषप्रयोग’, ‘रहस्यमय काळा कुत्रा’ आणि ‘दर्यागंजचा खुनी लेखक’ अशा चटकदार कथा ते सादर करतात|
-
Atmarangin Ruskin Bond (आत्मरंगी रस्किन बॉन्ड)
रस्किन बाँड... गेली साठ वर्षं सर्व वयोगटांतल्या, शहरांतल्या, लहान गावांतल्या वाचकांना ते रिझवत आहेत, त्यांच्यासाठी ते जणू जवळचे सोबतीच बनले आहेत. त्यांच्या कथांनी, पुस्तकांनी आपलं मनोरंजन झालं, कधी आपल्याला भुरळ घातली, तर कधी घाबरवलंही. त्यांच्या लिखाणानं वाचकांची सौंदर्यदृष्टी विकसित झाली आणि रोजच्या आयुष्यातलं, निसर्गातलं सौंदर्य टिपण्याची वाचकांची अभिरुची खुलली. निराश वाचकांच्या चेहर्यांवर त्यांनी हास्य फुलवलं आणि संकटांच्या अंधारात त्यांनी वाचकांना सावरलं. आत्मरंगी (मूळ पुस्तक - लोन फॉक्स डान्सिंग) हे रस्किन बाँड यांचं प्रांजळ आत्मकथन! या कथनात त्यांच्या कथांची, लेखनाची बीजं गवसतात.
-
Sundar Pichai Googlecha Bhavishya (सुंदर पिचई गुगल
जागतिक स्तरावरची महाकाय टेक कंपनी ‘गूगल’ आणि तिचा चेहरामोहरा पालटून टाकणाऱ्या एका भारतीय तरुण नेतृत्त्वाची ही आहे झंझावाती कहाणी... तरुण वयाचा सुंदर पिचई तंत्रज्ञानावरचं आपलं निरपवाद प्रभुत्त्व सिद्ध करत ‘गूगल’मध्ये यशाची शिडी झपाट्याने चढत होता. साहजिकच ‘गूगल’च्या ‘सीईओ’पदी पिचईची झालेली निवड स्पर्धक कंपन्यांनाही अनपेक्षित नव्हती. उलटपक्षी त्याच्या नेतृत्त्वाखाली ‘गूगल’ नव्या आव्हानांना कसं तोंड देतं, याचीच उत्सुकता सर्वांना लागली होती. तंत्रज्ञानाच्या प्रभुत्त्वाबरोबरच पिचईकडे भविष्याचा वेध घेणारी ‘व्हिजन’ होती. सोबतीला व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्यांची जोड होती. माणसांना एकत्र घेऊन काम करण्याची हातोटी होती. त्याच बळावर त्याने क्रोम, क्रोम ओएस, अँड्रॉइड वगैरे उत्पादनं विकसित केली. ही उत्पादनं आता जगावर अधिराज्य गाजवत आहेत. पिचईचा ‘मिडास टच’ लाभलेल्या ‘गूगल’ने आता नवी भरारी घेतली आहे. या पुस्तकात पिचईच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, ‘गूगल’मधल्या प्रवेशापासून ते सीईओ पदापर्यंतचा त्याचा विलक्षण प्रवास, त्याने ठामपणे घेतलेले निर्णय, पेललेली आव्हानं, ‘गूगल’ला प्राप्त करुन दिलेलं अत्युच्च स्थान याचा उहापोह रंजकपणे आणि प्रभावीपणे केला आहे. सुंदर पिचई आणि दैनंदिन जगण्याचा भाग बनलेलं ‘गूगल’ यांच्या यशाचं मर्म सांगणारं आणि २१व्या शतकातलं बहुपेडी नेतृत्त्व कसं असावं आणि ते कसं घडतं हे उलगडून दाखवणारं पुस्तक सुंदर पिचई - गूगलचं भविष्य...