-
Balakanche Aarogya Ani Aayurved (बालकांचे आरोग्य आणि आयुर्वेद)
आयुर्वेदाच्या सिद्धांतांवर आधारित असे हे पुस्तक लिहिताना आजच्या काळातील संदर्भही आम्ही जागोजागी घेतले आहेत. जेणेकरून या पुस्तकाला एक Practical handbook चे स्वरूप यावे. हे करताना तत्व आणि व्यवहार यांची उत्तम सांगड घालण्याचा आम्ही पदोपदी प्रयत्न केला आहे हे आपल्याला पुस्तक वाचताना लक्षात येईलच.
-
Nirogi Raha (निरोगी रहा)
डॉ. परीक्षित शेवडे आणि डॉ. स्वराली शेंड्ये यांचे 'निरोगी रहा' हे पुस्तक स्वतःला निरोगी ठेवण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक मार्गदर्शनाची एक संक्षिप्त तरीही तपशीलवार ओळख करून देणारे एक उत्तम मार्गदर्शक आहे. भारतीय ग्रंथ परंपरेला अनुसरूनच, त्यांनी स्वस्थ (आरोग्यपूर्ण) या शब्दाच्या व्याख्येपासून सुरुवात करून त्यानंतर वर्षभरातील बदलत्या ऋतूंनुसार अवलंबल्या जाणाऱ्या दैनंदिन पद्धती आणि आवश्यक बदलांचे थोडक्यात पण सूक्ष्मपणे स्पष्टीकरण दिले आहे. आयुर्वेदात नवीन असलेल्या वाचकांना हे पुस्तक विषयाची उत्तम ओळख करून देईल आणि स्वत:चा प्रतिबंधात्मक प्रवास सुरू करण्यासाठी पुरेसा तपशील प्रदान करेल. लेखकांनी त्यांच्या विशिष्ट शिफारसींच्या समर्थनासाठी संबंधित संदर्भ आणि प्रकाशने देखील दिली आहेत, ज्यामुळे जिज्ञासू वाचकांना या विषयातील पुढील संशोधनासाठी मार्ग खुला होईल. वाचकाने या पुस्तकात सुचवलेल्या प्रत्येक पैलूतील किमान एक बदल स्वीकारावा, त्याचे फायदे (किंवा मर्यादा) स्वत: अनुभवावे आणि नंतर स्वत:च्या प्रकृतीनुसार प्रतिबंधात्मक उपचार सानुकूल (customize) करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन घ्यावे. आयुर्वेदाचे उद्दिष्ट 'स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम्' (स्वस्थाच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे) आणि 'आतुरस्य विकारप्रशमनं च' (रुग्णाच्या आजाराचे निवारण करणे) हे आहे. हे पुस्तक अन्न उत्पादन, साठवणूक, भेसळ आणि फसवणूक यांसारख्या आजच्या काळातील आव्हानांकडे लक्ष वेधून आणि त्यातून मार्ग कसा काढावा, हे सांगून आयुर्वेदाचे उद्दिष्ट साध्य करते. एका जागरूक वाचकाने या पुस्तकापासून सुरुवात करायला हवी, मात्र स्वतःचा प्रतिबंधात्मक आरोग्याचा मार्ग हा स्व-अभ्यास, सराव आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातूनच तयार करायला हवा, हे लक्षात ठेवावे. -- नीलेश नीलकंठ ओक लेखक, वक्ते, मूळ संशोधक
-
Jamat E Purogami (जमात ए पुरोगामी)
पत्रकार वा साहित्यिक यांना पुरोगामी प्रतिगामी असायची कुठलीही गरज असते. समाजाचे प्रबोधन हे अशा वर्गाचे खरे कर्तव्य असते. जेव्हा असा वर्ग विचारधारेचा गुलाम होतो आणि खोटीनाटी प्रमाणपत्र पुरवून जनतेची दिशाभूल करण्यास हातभार लावण्यात पुढाकार घेतो,तेव्हा त्याचेही दिवाळे वाजू लागते. आज वर्तमानपत्रे,वाहिन्या किंवा साहित्य क्षेत्राची त्यामुळेच धूळधाण उडालेली आहे.नावाजलेले संपादक वा माध्यमे दिवाळखोरीत गेली आहेत. हमीद दलवाईंच्या पुरोगामी विचार वा भूमिकांना हेच लोक पायदळी तुडवत असतील , तर त्यांचे पुरोगामी मुखवटे फाडण्याची गरज आहे आणि त्या मुखवट्याआड लपलेल्या पुरोगामी जमातीचा खरा चेहरा सामान्य माणसाला दाखवणे अगत्याने आहे. एकवेळ जिहादी कसाब किंवा तालिबानी ओसामा परवडला. कारण तो समोरून येणारा उघड शत्रू असतो. पण जमते पुरोगामी हा गाफील ठेऊन मिञरूपाने येणार मायावी राक्षस असतो. त्याच्याविषयी जनतेला सातत्याने सावध करणे व त्याच्या मायावी रुपमागचा हिडीस चेहरा लोकांना उग्गोचर करून दाखवणे, हे खरेखुरे पुरोगामी व प्रगतिशील कार्य आहे.