-
Dnyanendriyantun Jivan (ज्ञानेंद्रियातून जीवन)
हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही, ते अनुभवण्यासाठी आहे. दैनंदिन धावपळीत आपण आपल्या विचारांमध्ये आणि इतर कामांमध्ये इतके गुंतून जातो की, आजूबाजूच्या सुंदर जगाकडे आपलं लक्षच जात नाही. लेखिका ग्रेचेन रुबिन यांच्या बाबतीतही असंच झालं. इंद्रियाच्या बाबतीतील एका धक्कादायक घटनेमुळे त्यांना अचानक लक्षात आलं की, त्या आसपासचं जग अनुभवतच नव्हत्या. त्या म्हणतात, गंध, चव, स्पर्श, दृष्टी आणि श्रवण या इंद्रियांना जाणीवपूर्वक अनुभवायला शिकलं, तर आयुष्य समृद्ध आणि आनंदी होऊ शकतं. मग त्यांनी या पंचेंद्रियांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. कसं, ते या पुस्तकात वाचायला मिळेल. या पुस्तकात, पंचेंद्रियांचं महत्त्व दैनंदिन छोट्या गोष्टींत (जसे आवडते अन्न, गाणी) आनंद शोधण्याची कला छोट्या सवयी आणि प्रयोगांमधून स्वतःला नव्याने ओळखण्याचा अनुभव वर्तमान क्षणात पूर्णपणे कसं जगायचं अधिक ऊर्जा, उत्साह आणि प्रेमाने जगण्याचा मार्ग "वर्तमान क्षणात जगण्याची प्रेरणा देणारं आणि प्रत्यक्षात उपयोगी पडणारं मार्गदर्शक" - सुसन केन, क्वाएटच्या लेखिका
-
Anandtarang (आनंदतरंग)
पावसाळ्यातल्या एका दुपारी ग्रेचेन रुबिनला अचानक साक्षात्कार झाला, आणि तो देखील एका अनपेक्षित ठिकाणी – बसमध्ये. तिला जाणवले की, “दिवस मोठे असतात, पण वर्षे छोटी असतात”. “वेळ निघून जात आहे, आणि महत्वाच्या गोष्टींवर मी पुरेसे लक्ष देत नाही आहे.” त्याक्षणी तिने पुढचे एक वर्ष तिच्या ‘हॅपीनेस प्रोजेक्ट’ला वाहून घेतले. आनंदी कसे व्हावे या विषयी युगानयुगे अनुभवातून आलेले शहाणपण, हल्लीचे शास्त्रशुद्ध संशोधन आणि वेगवेगळ्या संस्कृतीमधून मिळवलेली माहिती, हे सगळे वापरून रुबिन तिच्या आनंदी होण्याच्या प्रयत्नांचा बारा महिन्याचा प्रवास तिच्या रोचक आणि खिळवून टाकणाऱ्या शैलीत वर्णन करते. या प्रवासात तिला बऱ्याच गोष्टी जाणवल्या – नाविन्य आणि आव्हाने यातून आनंद निर्माण होतो, योग्य प्रकारे वापरला तर पैसादेखील आनंद देऊ शकतो, तुमच्या आजूबाजूचे नेटकेपण तुम्हाला मनःशांती देऊ शकते आणि छोट्यातले छोटे बदल खूप मोठा फरक घडवून आणतात.