-
Bhadramukhi (भद्रमुखी)
भद्रमुखि नामक बेटावर विज्ञाननं भाकित केलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचं निरिक्षण करण्यासाठी वैज्ञानिकांची एक तुकड़ी येते. या बेटावर एका मानवी समूहाचंही वास्तव्य आहे. या समुहाच्या आदिम संस्कृतीचं, परंपरारिवाजांचं, जीवनसंघर्षाचं नाट्यमय आणि उत्कंठावर्धक दर्शन घडवणारी ही विज्ञान-कादंबरी. भविष्याचा वेध घेत प्रत्यक्ष घडू पहाणार्या एका वैज्ञानिक सत्याचारी बरोबरीन अन्वयार्थ लावणारी. एका मानवी समुहाची विजीगीषा आणि विज्ञानाच्या प्रगतिशील पावलांवरही विजय मिळवू पाहणारी निसर्गाची अदम्य शक्ति यांची परस्परसंवादी समांतरता, हे या कादंबरीचं सूत्र. विज्ञानकथा -कादंबर्या लिहिणार्या मोजक्या लेखाकांताही कसदार नि समर्थ विज्ञानकथा-लेखक म्हणून अरुण हेबळेकररांचं नाव वरच्या श्रेणीत येतं. विज्ञानाकरता विज्ञान हां अट्टाहास न बाळगता,विज्ञानाला एखाद्या व्यक्ति-रखेइतकी स्वाभाविक, जिवंत भूमिका ललित साहित्यात देणं, हे अरुण हेबळेकरांच्या लेखनाचं वैशिष्ट्य.फॅटसीची धूसरता आणि विज्ञानाची सत्यता यांची अदभुत रम्य गुंफण आणि व्यक्तिरेखांचं सूक्ष्म, मार्मिक आकलन लक्षणीय विज्ञान-कादंबरी या अर्थानं 'भद्रमुखि' निश्चितच नावाजली जाईल!
-
Operation Molasys (ऑपरेशन मोलॅसिस)
परदेशात काम करणारा एक तरुण, जिज्ञासू भारतीय संशोधक. संशोधन करताकरता हाती आलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या गुपितापायी मारला जातो, आणखी एक अनाकलनीय गुपित मागे ठेवून. त्या गुपिताचा एक हिस्सा असते त्याची बहीण. एक सामान्य मुलगी. ही सामान्य मुलगी त्या अनोळख्या देशात आपल्या मृत भावाचं शरीर ताब्यात घ्यायला निघते. तेथील अपरंपार अडचणींची जाणीव असूनही स्वत:ला खंबीर बनवते. प्रत्यक्षात मात्र संकटांची एक जीवघेणी मालिकाच तिच्याभोवती सुरूहोते... तिचा अक्षरश: अंत बघू लागते... ते गुपित आणि त्या जीवघेण्या गुपिताची पाळंमुळं जिथपय|त पोहोचली होती, तो भयानक मार्ग ! सारंच गूढ, अतर्क्य...