-
Vichar Kara Aani Shrimant Vha
या पुस्तकात पैसा मिळविण्याची अशी रहस्य दडलेली आहेत जी तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतील. 'विचार करा आणि श्रीमंत व्हा' हे पुस्तक लेखकाच्या 'लॉ ऑफ सक्सेस' या प्रसिद्ध पुस्तकावर आधारीत आहे आणि यात अमाप संपदाधारी प्रसिद्ध आणि यशस्वी लोकांच्या यशस्वितेचं रहस्य उलगडून दाखविलं गेलं आहे. यशस्वितेचा 'ऍण्ड्रयू कारनेजी फार्मुला' या पुस्तकामागील खरी प्रेरणा आहे. कारनेजी यांनी ज्या युवकांना हे रहस्य शिकवलं ते सगळेजण श्रीमंत झाले आणि याप्रमाणे कारनेजी यांनी आपल्या फॉर्म्युल्याची शक्ती सिद्ध करुन दाखवली. हे पुस्तक आपल्याला ते रहस्य तर शिकवेलंच पण त्याचबरोबर त्यांच्यासारख्या अन्य महान लोकांची रहस्यही उलगडून शिकवेल. हे पुस्तक आपल्याला फक्त काय करायचं आहे एवढंच न सांगता ते कसं करायचं ते देखील शिकवेल. जर आपण यात वर्णन केलेली मूलभूत तंत्र शिकाल व त्यांची अंमलबजावणी पण कराल तर आपण खर्या आणि दीर्घकालीन यशस्वितेच्या रहस्याचे अनुकरण करण्यात निष्णात व्हाल. आणि मग जीवनात आपण जे इच्छिता ते सर्वकाही आपल्याला मिळू शकेल.