-
Khaki Files (खाकी फाइल्स)
‘खाकी फाइल्स’ हे नीरज कुमार यांच्या कारकिर्दीतील काही मोठ्या प्रकरणांची आणि त्यांच्या पोलीस तपासाची रंजक माहिती पुरवणारं पुस्तक. यात देशातील सर्वांत मोठ्या लॉटरी घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यापासून ते तहलका प्रकरणातील दोन पत्रकारांना ठार मारण्यासाठी आयएएसने आखलेला कट उधळून लावण्यापर्यंत अनेक प्रकरणांचा समावेश आहे. इतर वेळी टीकेचे धनी होणाऱ्या भारतातील पोलीस दलाच्या चमकदार कामगिरीवर प्रकाश टाकणारं हे पुस्तक वाचणं खरंच वेगळाच अनुभव देणारं ठरेल.
-
Patna Blues (पटणा ब्लूज )
‘पटणा ब्लूज’ एका नायकाचा प्रवास उलगडत जात देशातील सामाजिक स्थितीवर गहन भाष्य करते. कादंबरीचा नायक आरिफ IAS ची कसून तयारी करतो आहे. आई वडील, तीन बहिणी आणि एक धाकटा भाऊ झाकीर; वातावरण पाटण्याचं. घरची बेताची स्थिती आणि सर्वसामान्य कौटुंबिक आयुष्य. पण निव्वळ एक धार्मिक ओळख आरिफच्या कुटुंबापुढे संकटांची मालिका उभी करते. अशात आरिफ एका विवाहित महिलेच्या प्रेमात पडतो आणि त्यातून तेढ वाढत जाते. सरळसाधं वाटणारं आरिफचं आयुष्य एका विवरात अडकून जातं.
-
Dharmanmadhil Bandhutvachya Margavar (धर्मांमधील ब
जगभर धार्मिक हिंसेच्या वाढत्या घटनांकडे पाहता धर्माधर्मांमधील संवाद काळाची गरज बनला आहे. परमपूज्य बौध्द धर्मगुरू दलाई लामा अशा धर्मांतर्गत संवादासाठी विशेष प्रयत्नशील आहेत. धर्मांमधील बंधुत्वाची गरज अधोरेखित करताना ते सर्वधर्मीय शिकवणींचा समग्र मागोवा घेतात. या त्यांच्या चिंतनात्मक पुस्तकात सर्व धर्मांमधील एकसूत्रता आणि सहिष्णुतेची शिकवण अधोरेखित होते.
-
Kahani Pahilya Aagingadichi (कहाणी पहिल्या आगीनगाड
भारतात १८५३मध्ये पहिली रेल्वे धावली. या शोधाने भारतीय जनजीवनाचा चेहरामोहरा बदलला. या पहिल्या आगीनगाडीच्या आगमनाची कहाणी अनेकानेक रोचक गोष्टींनी भरलेली आहे. . रेल्वेच्या विस्तारित जाळ्याबरोबरच अनुषंगिक प्रसंग,रेल्वे स्थानकाच्या निर्मितीचा इतिहास आणि त्या संदर्भातील छोटे उपकथानक या सर्वांचा रोचक, ऐतिहासिक वृत्तान्त या पुस्तकात समाविष्ट आहे. मुंबईतलं पहिलं वाफेचं इंजिन,आगगाडीला भुताटकी समजणारा भोळा समाज आणि त्यावेळच्या गमतीजमतींसह तत्कालीन अद्भुत व चित्ताकर्षक तपशीलवार गोष्टींमुळे त्या सोनेरी दिवसांचं चित्रच जणू डोळ्यांसमोर उभं राहातं.