-
The New BJP (दि न्यू बीजेपी)
"२०१४ पासून भाजपने केंद्र आणि राज्य दोन्ही पातळ्यांवर निवडणुकांमागे निवडणुका जिंकल्या आहेत. हे त्यांच्या हिंदू परिघापलीकडच्या विस्ताराचे संकेत आहेत. प्रश्न असा आहे की, जात, धर्म आणि लिंगाधारित विभागणीच्या पुढे जात इतके लोक अनाकलनीय आक्रमक हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या पक्षाला मत का देतात? त्यांच्या बहुचर्चित विकास योजनांमध्ये दोष काहीही असोत, त्या योजनांच त्यांच्यासाठी लक्षवेधी ठरताहेत का? की आरएसएस केडरचे सक्रिय एकत्रीकरण कारणीभूत ठरतेय? या आकर्षक सुधारणावादी इतिहासात, राजकीय शास्त्रज्ञ आणि पत्रकार नलिन मेहता भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष कसा बनला याचे परीक्षण करतात. पक्षाच्या हिंदुत्वाच्या राजकारणाच्या नेहमीच्या कथनाच्या पलीकडे जाऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात त्यांनी स्वत:च्या सोशल इंजिनिअरिंगचा ब्रँड वापरून भारतीय राजकारणाचा आकार कसा बदलला हे स्पष्ट केले. ही पुनर्रचना चतुराईने नवीन जातीय युती, उपेक्षित सामाजिक गटांवर लक्ष केंद्रित करणार्या नवीन कल्याणकारी राज्याचा दावा आणि महिला मतदारांचा आधार बनवण्याद्वारे करण्यात आली. भारतीय राजकीय पक्षांच्या जातीय रचनेचा अभ्यास करणार्या तीन अनन्य निर्देशांकांच्या डेटावर आधारित मांडणी मेहता करतात. पक्ष आणि देश या दोहोंच्या कार्यपद्धतीबद्दल द न्यू बीजेपी पुस्तक चकित करणारी नवी अंतर्दृष्टी देते. पूर्वी न वापरलेल्या ऐतिहासिक नोंदी, पक्षाच्या नेत्यांच्या विशेष मुलाखती आणि संपूर्ण भारतातील सर्वसमावेशक अहवाल यातून देशातल्या राजकीय स्थित्यंतराचा आलेखच समोर येतो. भाजप आणि आजच्या भारताचा स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ अभ्यास करणारे हे पुस्तक आहे जे राजकीय विभाजनाच्या सर्व बाजूंनी सहभाग आणि वादविवादाची मागणी करते. "
-
The Monkeys Raincoat (द मंकीज रेनकोट)
जेव्हा एलन लँग एल्विस कोलच्या ऑफिसमध्ये येते तेव्हा तिचा नवरा आणि मुलगा दोघेही बेपत्ता असतात. वरकरणी पाहता हे प्रकरण साधे वाटत असले तरी एल्विस कोल किंवा त्याचा ताकदवान सहकारी ज्यो पाईक यांना त्यात फार काही रोमांचक किंवा आव्हानात्मक वाटत नाही. पण हॉलिवूडच्या स्टुडिओपासून सुरू झालेले हे शोध प्रकरण त्यांना अमली पदार्थ आणि लैंगिकता आणि खुनापर्यंत घेऊन जाते. आता हे प्रकरण नुसतेच रोमांचकारी, आव्हानात्मक नसते तर घाणेरडेदेखील होते. कारण पोलिसांपासून ते गुंडांपर्यंत सर्वांनीच एलन आणि एल्विस यांच्याविरुद्ध युद्ध पुकारलेले असते. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही एल्विस अखेरच्या दुव्यापर्यंत पोहचतोच, पण तो उत्कंठावर्धक प्रवास हे पुस्तक वाचूनच अनुभवता येईल.
-
The Wanted (द वॉन्टेड)
"‘दि वॉन्टेड’या रॉबर्ट क्रेझ यांच्या मूळ कादंबरीचा तितकाच थरारक अनुवाद !एक थरार किंवा चैनीसाठी तीन तरुण मुलं अठरा ठिकाणी चोऱ्या करतात. पैसे, दागिन्यांबरोबर लॅपटॉपही चोरतात. यातल्या एका लॅपटॉपमध्ये असते अतिशय महत्त्वाची माहिती. ती उघड झाली तर काही उच्च पदस्थांना फासावर जावे लागण्याची शक्यता असते. मग तो चोरीला गेलेला लॅपटॉप मिळविण्यासाठी सुरू होतो जीवघेणा, थरारक पाठलाग ..! चोरी करणाऱ्या मुलांच्या मागे दोन गुंड ,त्यांच्यामागे एक सहृदयी गुप्तहेर आणि पाठोपाठ पोलीस ...त्या पाठलागातून कसे खून होतात आणि तीन तरुण मुलं त्यातून वाचतात की नाही प्रत्येक पानागणिक उत्कंठा वाढविणारे ,विलक्षण वेगवान कथानक, वाचक जागीच खिळून राहतो आणि या ‘पाठलागात कधी सामील होतो हे कळतही नाही...! "