-
Bharadast Gunijan (भारदस्त गुणीजन)
पंचावन्न लोकप्रिय व गुणी व्यक्तींची माहिती या पुस्तकात आहे. या पंचावन्न व्यक्तींबद्दलचे हे लेख वाचणाऱ्यांनाही खूप भारी वाटेल. प्रत्येक माणसात लपलेले गुण जगापुढे यावेत या भावनेने हे लेख लिहिलेले आहेत.
-
Bhari 60 (भारी ६०)
साठ लोकप्रिय व गुणी व्यक्तींची माहिती या पुस्तकात आहे. या साठ व्यक्तींबद्दलचे हे लेख वाचणाऱ्यांनाही खूप भारी वाटेल. प्रत्येक माणसात लपलेले गुण जगापुढे यावेत या भावनेने हे लेख लिहिलेले आहेत.
-
Aadaranjali (आदरांजली)
विविध क्षेत्रांमध्ये अनेक कर्तबगार होऊन गेले. अलीकडे अनेक चांगल्या व्यक्ती हे जग सोडून गेल्या. खूप लोकप्रिय अशा. सर्वच नसतील, पण गुणी नक्कीच होत्या. काही तर थोड्याशा ‘‘खल’’ म्हणता येतील अशा होत्या. पण त्यांच्यात सुद्धा काही चांगले गुण होते. ज्या व्यक्तींची नक्कीच समाज दखल घेऊन होता. अशा व्यक्तींचे निधन झाल्यावर त्यांच्यावर लिहिण्याची संधी लेखकाला मिळाली. ते मृत्यू लेख प्रसिद्ध झाले. त्या लेखांचा संग्रह म्हणजे ‘‘आदरांजली’’ हे पुस्तक होय. थोडक्यात सांगायचं तर अशा प्रकारचे लेख म्हणजे त्या व्यक्तीला वाहिलेली श्रद्धांजली... आदरांजली असते. त्या व्यक्तीच्या स्मृती जतन करण्याचा तो एक मार्ग असतो. तो मार्ग चोखाळत हे लेख लिहिले गेलेत आणि त्याचे पुस्तक तयार करून आदरांजली वाहिली आहे. ही गेल्या काही वर्षात गेलेल्या गुणी माणसांची दखल आहे आणि त्यांच्या स्मृतींची उजळणी आहे. खूप काळ गेलेला नसूनही ह्यातील काही व्यक्ती लगेच विस्मृतीत गेल्याचे लेखकाला हे पुस्तक तयार करताना जाणवले.