-
Ishq @ Mandavi (इश्क एट मांडवी)
"कोकणातल्या सोनगिरी नावाच्या लहानशा गावात कनिष्ठ कर्मचारी म्हणून नेमणूक झालेला कथानायक मकरंद आपल्या समोर येतो. त्याच्या जोडीने आनंद आणि उमाकांत त्याच दिवशी त्याच कार्यालयात रुजू होतात. समवयस्क असल्याने तिघांची दोस्ती होते. अर्थात प्रत्येकाचा काहीतरी वेगळेपणा असतोच. लवकरच ते एकत्र राहू लागतात. आनंद जरा गंभीर तर उमाकांत थोडा फ्लर्ट आहे. मकरंदचं मांडवी गावातल्या एका मुसलमान तरुणीवर -आसमा तिचं नाव- प्रेम जडतं. तिचा मोठं भाऊ परदेशात राहतो. त्याची बायको मांडवीत असते. त्याच्या मित्रांकरवी त्याला जेंव्हा हे समजतं तेंव्हा तो आसमाला सक्त ताकीद देतो. प्रकरण पुढे वाढवायचं नाही अशी तंबी देतो. पुढे होतं असं की उमाकांत आणि ती भाभी यांचं अफेअर सुरू होतं. तो भाऊ अचानक परदेशातून येऊन उमाकांतवर खुनी हल्ला करतो. गोष्टीला विचित्र वळण लागतं. तर अशी ही कथा. मुंबईच्या रेल्वे PLATFORM वर सुरू होते आणि मडगावच्या फलाटावर येऊन थांबते. "
-
Ardha Dashak (अर्धदशक)
‘अर्धदशक’ ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यात आलेला कादंबरीचा नायक मोहन, करमरकर मॅडमशी केलेली मैत्री त्याला गोत्यात आणते. एकूणच, मोहन आणि त्याचे मित्र पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू हे तीन अडथळे कसे पार करतात याचं वास्तव आणि उत्कंठावर्धक चित्रण करणारी ही कादंबरी आहे, जी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची मानसिकता अधोरेखित करते.