-
Kaya (काया)
आयुष्याच्या उमेदीच्या काळातच मृत्युशी झुंजणारी वरेण्या...स्त्री-पुरुष संबंधांकडे धारदार नजरेने पाहणारी खैरून बीबी...आत्महत्तेच्या दोलायमान मनस्थितीत गुंतलेला विनोद... मानवी देह आणि त्यातील मनोवस्थांच्या सखोल चिंतनातून ‘काया’ कथासंग्रहातील प्रत्येक कथा आकार घेते. बलात्कारासारख्या विषयांना डॉ. प्रतिभा राय सत्र-मनाच्या उद्रेकी विचारांनी वाचा फोडतात. तर किशोरवयीन मुलांच्या मनातील घालमेल, व्यवसायानिमित्त दूरदेशी राहणाऱ्या माणसाला आपल्या जन्मभूमीविषयी वाटणारी ओढ अशा मनाला स्पर्शून जाणाऱ्या विविध भाव-भावनांचा वेधही त्या घेतात.
-
Poojaghar (पूजाघर )
ओरिसातील सर्वसाधारण समाजजीवन, ग्रामीण जीवन, राजकारणाचा समाजावर- विशेषतः कनिष्ठ वर्गावर होणारा परिणाम, मध्यमवर्गीय समाजाचे दर्शन, त्याचबरोबर जातिभेद, धर्मभेदांमुळे उसळणाऱ्या दंगली, त्याचे खरे सूत्रधार या सर्वांचे वेगळ्या दृष्टिकोनांतून विश्लेषण केलेले आढळते. श्री जगन्नाथाबद्दलची लोकांची असीम भक्ती, श्रद्धाही त्यांच्या कथांमध्ये आवर्जून पाहावयास मिळते. माणसांमध्ये दरी निर्माण करणाऱ्या भेदांचे मानवी दृष्टिकोनातून विश्लेषण करू पाहणाऱ्या या साहित्याचा अंश या कथांच्या अनुवादातून मराठी साहित्यात आला आहे. साध्या भाषेतल्या या कथा घटनांबरोबर भावनाही व्यक्त करणाऱ्या आहेत.