-
Options Trading Handbook (ऑप्शन्स ट्रेडिंग हँडबुक)
ऑप्शन्सवर तुम्ही हजारो पुस्तकं वाचाल; पण या पुस्तकात जेवढे ज्ञान दिलेले आहे तेवढे इतर कोणत्याही पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही. सगळे लेखक तुम्हाला ऑप्शन्सची माहिती, ऑप्शन्स ग्रीक्स वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र कोणत्याही पुस्तकातून तुम्हाला ऑप्शन्स तंत्रांची माहिती आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा ते सांगितले जात नाही, ज्याद्वारे एखादा अत्यंत तुटपुंजे उत्पन्न असणारा माणूसही ऑप्शन्स ट्रेडिंग करून श्रीमंत होऊ शकेल. अद्ययावत माहिती असलेल्या या पुस्तकात ऑप्शन्सच्या बाराखडीपासून ते ऑप्शन्स ग्रीक्सपर्यंत सगळे काही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहे. भारतीय स्टॉक मार्केट या विषयावर लिहिणार्या महेश कौशिक यांची पुस्तकं सर्वाधिक वाचली जातात. हेही त्यांनी लिहिलेले एक अप्रतिम पुस्तक आहे. कौशिक क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजावून सांगतात. हे पुस्तकदेखील त्यांनी एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात लिहिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला ते वाचताना कुठेही कंटाळा येणार नाही. एक सामान्य वेटर असलेला घिसूभाई या गोष्टीचा नायक आहे. प्रस्तुत पुस्तकात कौशिक घिसूभाईला ऑप्शन ट्रेडिंग कसे शिकवतात याचे उत्तम सादरीकरण केलेले आहे. विज्ञान शाखेतून पदवीधर झालेल्या महेश चंद्र कौशिक यांनी आपल्या करिअरची सुरुवात खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून केली होती. त्यानंतर राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारा राजस्थानमधील वाणिज्य कर विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या पदावर पाच वर्षे कार्य केल्यानंतर त्यांची नियुक्ती महसूल विभागात टी. आर. ए. पदी झाली. या पदावर त्यांनी 2001 ते 2017 पर्यंत कार्य केले. त्यानंतर त्यांना सहायक महसूल लेखा अधिकारी म्हणून बढती मिळाली. सध्या ते सिरोही येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत.
-
The Diary Of A CEO (द डायरी ऑफ अ सीईओ)
माझ्या उद्यमशीलतेच्या प्रवासात मी टोकाचे यश आणि अपयश यांचा सामना केला आहे. ते अनुभव आणि माझ्या पॉडकास्टद्वारे घेतलेल्या हजारो मुलाखती यांच्या मुळाशी काय आहे- कोणत्याही क्षेत्रासाठी लागू होऊ शकतील अशी काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेली काही मूलभूत तत्त्व असतात. जिला स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करायचे आहे, किंवा महान काही निर्माण करायचे आहे ती प्रत्येक व्यक्ती या तत्त्वांची अंमलबजावणी करू शकते. या मूलभूत नियमांचा अवलंब केल्यामुळे तुम्ही सर्वोत्तम कामगिरीच नोंदवता. मानसशास्त्र आणि वर्तनशास्त्र यांमधली तत्त्व, मी सर्वेक्षण केलेल्या प्रत्येक खंडातल्या आणि प्रत्येक वयोगटातल्या लाखो लोकांच्या शहाणपणाचे सार आणि अर्थातच माझ्या अत्यंत लोकप्रिय पॉडकास्टद्वारे मी जगातल्या सगळ्यांत यशस्वी लोकांशी साधलेला संवाद या सगळ्यांचे सत्व या नियमांमध्ये आहे. हे नियम आज लागू आहेत आणि आजपासून १०० वर्षांनीही लागू असतीलच. तुम्ही कधीपासून अमलात आणताय?
-
The Scam (द स्कॅम)
भारतामधल्या उद्योगक्षेत्रातल्या सत्यघटनेवर आधारित असलेलं हे सगळ्यात चित्तथरारक पुस्तक. भारतीय शेअर बाजारातल्या सर्वात मोठ्या दोन आर्थिक घोटाळ्यांशी संबंधित असलेल्या लोकांची आयुष्य आणि त्यांचा या घोटाळ्यांमधला सहभाग यांची वेगवान कहाणी यात सादर केलेली आहे. लहानपणी फारकत झालेल्या दोन जुळ्या भावंडांची पुन्हा भेट व्हावी असे दोन एकसारखे घोटाळे नऊ वर्षांच्या फरकानं घडले. १९९२ साली हर्षद मेहता होता तर २००१ साली केतन पारेख दोन्ही वेळा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) झोपा काढत असल्यामुळे अनेक बँका कोसळल्या. १९९१-१९९२ आणि १९९९-२००० या दोन्ही काळांमध्ये अत्यंत धोकादायक व्यवहार करून लोक शेअर बाजारात मोठी कमाई करत होते. 'श्रीमंतांसारखा विचार करा हा हितेन दलालचा १९९९ सालचा मंत्र होता. १९९२ सालाप्रमाणेच २००१ सालीसुद्धा एक शेअर दलाल न्यू यॉर्कच्या शेअर बाजारामध्ये व्यवहार करण्यासाठीचं सदस्यत्व मिळवण्याची धडपड करत होता. या दोन्ही घोटाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार खेळणं, नियंत्रकांनी डोळेझाक करणं, आपला आत्मसन्मान राखण्यासाठी टोकाला जाणं, प्रचंड नुकसान होणं आणि शेअर बाजार कोलमडून पडणं अशा अनेक बाबतींमध्ये साम्य दिसून येतं. यातच एकूण व्यवस्थेमधल्या दोषांची करुण कहाणीसुद्धा गुंफलेली आहे... मान्यवर समजल्या जाणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांच्या मदतीनं व्यावसायिक नीतिमत्तेच्या चिंधड्या उडवत एका सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रवर्तकानं अत्यंत सहजपणे कसा दिवसाढवळ्या दरोडा घातला... सगळ्या मोठ्या घोटाळेबाजांना मदत करणाऱ्या मान्यवर ग्लोबल ट्रस्ट बँकेचा धुव्वा कसा उडला... हर्षदला झालेल्या विलक्षण नुकसानामुळे प्रचंड अडचणीत आलेल्या एका बँकेला RBI नं अत्यंत तत्परतेनं कसं अडचणीतून बाहेर काढलं.