-
Saad Ghalto Kalahari (साद घालतो कालाहारी)
This is the story of the Owens' Travel and life in the Kalahari desert. Here they met and studied unique animals and were confronted with danger from drought, fire, storms, and the animals they loved. This best-selling book is for both travellers and animal lovers. ‘क्राय ऑफ कालाहारी’ हे पुस्तक म्हणजे कालाहारी वाळवंटात सात वर्षे राहिलेल्या मार्क आणि डेलिया ओवेन्स यांच्या जंगली प्राण्यांच्या सहवासातील अनुभवांवर आधारित कादंबरी आहे. त्याचा मंदार गोडबाले यांनी मराठी अनुवाद केला आहे. बदली कपड्यांचा एक जोड आणि एक दुर्बीण वगळता बाकी विशेष काही न घेता मार्क आणि डेलिया या तरुण अमेरिकन जोडप्याने प्राणिजीवनाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेचे विमान पकडले. तिथे पोहोचल्यावर एक जुनाट लँडरोव्हर गाडी विकत घेऊन त्यांनी कालाहारी वाळवंटात (डिसेप्शन व्हॅली) खोलवर मजल मारली. ते सात वर्षे त्या परिसरात राहिले. विशेष म्हणजे त्या ठिकाणी कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता, तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे. हजारो चौरसमैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्रोत नव्हता. त्यांच्या आजूबाजूला जे प्राणी होते, त्यांनीही कधी माणूस पाहिला नव्हता. मध्य कालाहारी कितीही मोठे असले, तरी त्यामध्ये तेथील अस्थिर प्राणिसृष्टीसाठी पे अन्न-पाणी नाही, चरणाऱ्या आणि शिकारी दोन्ही प्राण्यांसाठी! त्या अभयारण्यात एकही कायमस्वरूपी पाणवठ्याची जागा नाही; त्यामुळे पिल्लांची व स्वतःची सुरक्षितता आणि बदलत्या ऋतूमानानुसार कालाहारीतील हायना (तरस), सिंह, हरणे, कोल्हे आणि इतर अनेक प्राणी सतत आपली निवासाची जागा बदलत असतात. या प्रचंड जंगलात ओवेन्स जोडप्याने आपला प्राणिशास्त्राचा अभ्यास केला. यामध्ये या जोडीने दिवसा तसेच रात्री-अपरात्री पा वेळ देऊन अनेक प्राण्यांचे अगदी बारकाईने निरीक्षण केले व अभ्यास केला आणि वेळोवेळी त्याच्या नोंदी केल्या.