-
Lifestyle (लाईफस्टाईल)
तुमची ‘लाईफस्टाईल’ कशी असावी? हे ठरवायचं तुमचं तुम्हीच! तो अधिकार आणि स्वातंत्र्य फक्त तुम्हालाच, इतर कुणालाही नाही.
-
Rang Sukhache (रंग सुखाचे)
एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे जरतारी हे वस्त्र मानवा, तुझिया आयुष्याचे'' ग. दि. माडगूळकरांचा हा संदेश वेगवेगळ्या ढंगाने लेखिकेने या पुस्तकात फुलवला आहे. आजचं जीवन धकाधकीचं बनलेलं आहे. अनेक समस्या, संघर्ष आणि ताणांनी माणसाचं आयुष्य व्यापून गेलं आहे. आणि म्हणूनच तो सुखाला पारखा झाला आहे असे त्याला वाटते, परंतु सुख ही एक मानसिक सवय आहे. माणसाचं जीवन अनुभवणं यातच खरं सुख आहे. हे जीवन अनुभवताना भावनांचे, विचारांचे वेगवेगळे पैलू दृसि पडतात. या पैलूतून सुखाचे वेगवेगळे रगं नजरेस पडतात. अनुभवायला मिळतात. फक्त हे रंग पाहण्याची दृष्टी, तसा चष्मा आपणास असला पाहिजे व अशी 'दृष्टी’ देण्याचे मार्गदर्शन या पुस्तकातून रमा मराठे यांनी केले आहे. नेहमीच आनंदी राहण्याचे मर्म सांगणारे सुखाच्या प्राप्तीचे मार्ग सांगणारे पुस्तक.
-
Swabhavala Aushad Ahae (स्वभावाला औषध आहे)
सध्या सभोवतालच्या सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा चालू आहे. त्यामुळं अनेक जण चिंतेनं आणि काळजीनं ग्रासलेले आहेत.यामुळं मानसिक व्यथा आणि विकार उद्भवतातच; पण ज्यांना सायकोसोमॅटिक डिसीजीस् (Psychosomati[...]
-
Champion Va!
छोट्या दोस्तांनो, 'चॅम्पियन' व्हायचंय ? मग खास तुमच्यासाठी आहे, पंचतंत्र, नव्हे पंचसूत्र ! प्रथितयश लेखिका डॉ. रमा मराठे यांच्या सिद्धहस्त लेखणीचा नवा आविष्कार! तुम्हाला समजेल अशा सहज-सोप्या भाषेत व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी गोष्टीरूप खजिना... अभ्यास, आरोग्य, आत्मविकास, संस्कार, सामाजिक बांधीलकी ही पंचसूत्री करा आत्मसात आणि... गुणवंत व्हा ! यशवंत व्हा ! जयवंत व्हा ! सुखानं राज्य करा !