-
Dreams Of Joy (ड्रीम्स ऑफ जॉय)
जॉय ही एकोणीस वर्र्षांची मूळ चिनी वंशाची मुलगी अमेरिकेतून चीनमध्ये येते, झेड. जी. या तिच्या चित्रकार असलेल्या वडिलांना शोधण्यासाठी. झेड.जी. तिला भेटतात. ती त्यांच्याबरोबर एका खेड्यात जाते. तिथे ताओ नावाच्या शेतकरी मुलाशी लग्न करते. तिला मुलगी होते; पण खेड्यातील कष्टप्रद जीवन, तिच्या नवNयाचं आणि त्याच्या कुटुंबाचं स्त्रीद्वेष्टेपण तिला रुचत नाही. तिच्या खेड्यावर ओढवलेल्या उपासमारीच्या संकटात ती, तिचा नवरा आणि मुलगी मरणाच्या दारात जातात; पण तिला शोधत अमेरिकेहून चीनला आलेली तिची आई पर्ल आणि झेड.जी. त्यांना तिथून बाहेर काढतात आणि वाचवतात. आता या सगळ्यांना चीनमधून कायमचं निसटून हाँगकाँगला जायचं असतं; मात्र सरकारच्या जाचक धोरणांमुळे ते महाकर्मकठीण असतं. कसं पार पाडतात ते हे दिव्य? शेवटी ते हाँगकाँगला पोचतात की नाही? कम्युनिस्ट राजवटीच्या पाश्र्वभूमीवरील, स्थलांतरितांच्या आणि स्थानिकांच्याही गळचेपीचं, शोषणाचं विदारक चित्रण करणारी कादंबरी.
-
Shanghayachya Muli (शांघायच्या मुली)
शांघाय शहरातील पर्ल व मे या दोघी तरुण बहिणी... जुगारात हरल्यानंतर त्यांचे वडील या दोघींनाही लॉस एंजलिसला स्थायिक झालेल्या लुई नावाच्या मूळ चिनी माणसाच्या दोन मुलांच्या वधू म्हणून विकतात...त्या दोघींचा चीन ते अमेरिका असा खडतर प्रवास, लुईच्या कुटुंबात गेल्यानंतरचं त्यांचं आयुष्य आणि कालांतराने परिस्थितीवश या दोघींमध्ये उभी राहिलेली भिंत...स्थलांतराच्या अनेक पैलूंचं दर्शन घडवणारं, मनाला चटका लावणारं भावनाट्य