-
Chamblechya Palikade (चंबळेच्या पलीकडे)
महादजी शिंदे...दौलतीची निरपेक्ष सेवा करणारे...अंतर्गत बंडाळ्यांमुळे व्यथित होणारे...राघोबादादांचा बिमोड करण्यासाठी, इंग्रजांना वठणीवर आणण्यासाठी, मोरोबा आणि बापूंचा नानांना गोत्यात आणण्याचा डाव उधळण्यासाठी, करवीरकरांचा बंदोबस्त करण्यासाठी नानांच्या मदतीला धावलेले ...नानांनी कोणत्याही प्रकारे सहकार्य न देता उलट महादजींचा द्वेष करूनही उत्तरेत मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित करणारे...कवायती फौज पदरी बाळगणारे...नानांना वठणीवर आणण्यासाठी त्यांना उघडउघड शह देणारे...सवाई माधवरावांच्या पायी निष्ठा वाहणारे... इंग्रजांना शरण यायला भाग पाडणारे...भाऊसाहेब तोतया प्रकरणात मदतीला धावणारे...अहिल्याबाईंच्या विरोधात राघोबादादांना साथ देण्यास स्पष्ट नकार देणारे...नानांना दिलजमाई करण्यास भाग पाडणारे...दिल्लीच्या बादशहाला त्याच्या तख्तावर परत नेऊन बसवणारे... अशा महादजींच्या पराक्रमाची आणि स्वामिनिष्ठेची धगधगती कहाणी
-
Dusare Jagatik Mahayuddha (दुसरे जागतिक महायुद्ध)
पहिल्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांमुळे जर्मनीची दुर्दशा झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर जर्मन तरुणांच्या मनात सुडाचा अंगार पेटला होता. अशा परिस्थितीत नॅशनल सोशालिस्ट जर्मन वर्कर पार्टीची स्थापना झाली. त्याचा पुढारी म्हणून हिटलरची निवड झाली. त्याने कपटाने जर्मनीचं अध्यक्ष आणि पंतप्रधानपद मिळवलं. त्याच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. हॉलंड, बेल्जियम, इटली, आफ्रिका इ. अनेक राष्ट्रांचा युद्धात सहभाग होत गेला. ते युद्ध कशा तर्हेने झालं, कोणाची सरशी झाली, कोण हरलं, त्या त्या युद्धाचे त्या त्या देशावर, बेटावर किंवा एखाद दुसर्या शहरावर काय परिणाम झाले, या युद्धाशी संबंधित प्रमुख व्यक्तींनी (जर्मनचा राष्ट्राध्यक्ष हिटलर, इटलीचा पंतप्रधान मुसोलिनी इ.), त्यांच्या स्वभावानुसार, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार त्या त्या वेळी घेतलेले निर्णय आणि त्यांचे झालेले चांगले/वाईट परिणाम, सागरी लढाई, विमानातून झालेली लढाई, जमिनीवरील लढाई अशा तीन प्रकारे झालेल्या लढाईचे आकडेवारीनिशी संदर्भ इ. माहिती इत्थंभूतपणे देणारं पुस्तक आहे ’दुसरे जागतिक महायुद्ध.’
-
Pahile Jagatik Mahayuddha (पहिले जागतिक महायुद्ध)
ऑस्ट्रियाच्या युवराजाचा बोस्नियन तरुणाने केलेला खून ही घटना पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडण्यास कारणीभूत ठरली. ऑस्ट्रिया आणि जर्मनी या दोन्ही देशांना ऑस्ट्रियाच्या युवराजाच्या खुनाचा आळ सर्बियावर आणून तो देश घशात घालायचा होता, तसेच रशियन रेल्वे पूर्ण होण्यापूर्वी फ्रान्स आणि रशिया या दोन्ही देशांशी युद्ध करून त्यांचा पराभव करायचा होता; पण ऑस्ट्रिया व सर्बियादरम्यान छोट्या प्रमाणावर सुरू झालेले हे युद्ध त्या दोन देशांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण युरोपभर पसरले. तसेच पुढे युद्धाची खुमखुमी, युद्धठास्त देशांना पाठिंबा आणि विरोध, या व अशा इतर अनेक कारणांमुळे त्या युद्धात तुर्कस्तान, इटली, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी व अमेरिका आदी देशांचाही प्रवेश झाला. हे युद्ध जरी युरोपात झाले असले तरी जगातील बहुतेक सगळ्याच देशांना त्याची या ना त्या कारणाने झळ पोहोचली. पहिल्या जागतिक महायुद्धाची पार्श्वभूमी व कारणे, नानाविध कारणांमुळे त्यात सहभागी झालेले लहान-मोठे देश, लढाईचे वैविध्यपूर्ण प्रासंगिक वर्णन आणि परिणामांचा सार्थ आढावा.
-
Akherchi Ladhai (अखेरची लढाई)
अखेरची लढाई ही कादंबरी सवाई माधवराव पेशवे आणि नाना फडणीसांच्या जीवनातील विविध घटना-प्रसंगांवर आधारित आहे. नाना फडणीस उणीपुरी दोन तपे पेशवाईच्या कारभारात होते. सवाई माधवराव पेशव्यांच्या माता-पित्याचे अकाली निधन झाल्यानंतर पेशवाईचा वारस म्हणून त्यांनी सवाई माधवरावांची डोळ्यांत तेल घालून काळजी घेतली. त्यांचा आपल्या पुत्राप्रमाणे सांभाळ केला. माधवराव लहान असल्याने नानाच पेशव्यांच्या वतीने सर्व निर्णय घेत आणि राज्यकारभार पाहात असत. याच कालावधीत मुजोर झालेल्या निजामाला अद्दल घडविण्यासाठी नानांनी युद्ध पुकारले आणि आपल्या चातुर्याने (व दैवाची साथ लाभल्याने) ते जिंकून निजामाला सर्व अटी मान्य करायला लावून, शरण येण्यास भाग पाडले. पेशवे आणि दौलतीसाठी नाना फडणीसांना असाच परकीयांचा आणि स्वकीयांचाही सामना करावा लागला.
-
Mahaparva.. (महापर्व)
मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचा सुसूत्र लेखाजोखा. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य संभाजी महाराजांच्या वधानंतर मोगल आपल्या घोड्यांच्या टापांखाली तुडवत होते. औरंगजेब आणि त्याचे प्रचंड सैन्य मराठ्यांना चिरडू पाहत होते. सुमारे पंचवीस वर्षांहून अधिक काळ औरंगजेब आणि त्याच्या सैन्याला झुंजवणाNया राजाराम महाराज, संताजी-धनाजी, ताराबाई आणि अन्य अनुभवी मराठी सरदारांची शौर्यगाथा.