-
The Legend Of Bahirji Naik Part 2 (द लिजंड ऑफ बहिर्जी नाईक भाग २)
मराठा स्वराज्य १६६५ : प्रचंड मोठ्या मुघल फौजेने पुरंदरला वेढा घातला आहे अफगाणी सरदार दिलेरखान आणि मोठा नावलौकिक असलेले राजपूत सरदार मिझोराजे जयसिंग त्यांचे नेतृत्व करत आहेत. नुकतेच पंख फुटू लागलेल्या मराठा साम्राज्याला सगळ काही संपल्यासारखे वाटत होते. शिवाजी राजे सगळ्या बाजूंनी वेढले गेले होते, यातून चतुराईने कसा मार्ग काढता येईल याबद्दल राजे आपल्या सल्लागारांशी चर्चा करत आहेत. पण इतिहासाची पुनरावृत्ती होणारच. मुघल आणि आदिलशाही फौजांनी, गुलाम-सरदार असलेल्या सिद्धी जौहरच्या नेतृत्वाखाली आधीच स्वराज्याला वेढा घातला होता. आणि खुद राजे पन्हाळगडावर अडकले होते. आणीबाणीच्या वेळी धाडसी उपाययोजना करणे आवश्यक असते. रात्रीच्या अंधाराआड, थेट शत्रूच्या नाकासमोरून त्यांची सुटका करण्यासाठी एक अत्यंत धोकादायक योजना आखली गेली. तिथून निसटून ते विशाळ गडावर कसे पोहोचले याची चित्तथरारक कथा आणि त्या अनुषंगाने येणारी, मुघल फौजेला नेस्तनाबूत करून टाकणाऱ्या उंबरखिंडीच्या लढाईची कथा. शिवाजी राजांचे प्रसिद्ध गुप्तहेर किंवा गुप्तहेर खाते असलेल्या बहिर्जी नाईक यांच्या नजरेतून ही कथा उलगडत जाते. जे काही घडले ते, जगाने कधीच न पाहिलेल्या गनिमी काव्याचे एक सर्वात मोठे उदाहरण बनून गेले.
-
The Legend of Bahirji Naik Part 1 (दलिजंड ऑफ बहिर्जी नाईक भाग १)
मराठा स्वराज्य १६६३ शिवाजी राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न भंग पावत आहे. उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे शत्रू आहेत. सतत होणाऱ्या आक्रमणांमुळे स्वराज्याच्या सैन्याची धूळदाण उडाली आहे आणि खजिना संपत आला आहे. मुघल सुभेदार शाहिस्तेखान, मराठ्यांचे परंपरागत शहर, पुणे इथे त्याच्या ताब्यातील सैन्यासह तळ ठोकून बसला आहे. सगळ्या आशा मावळल्या आहेत. केवळ, शाहिस्तेखानला पुण्यातून बाहेर पळवून लावणे पुरेसे असणार नाही. टिकून राहण्यासाठी राजेंना स्वराज्याचा खजिना पुन्हा भरून काढवा लागणार आहे आणि सैन्याची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. इथून शंभर कोसांवर एक शहर वसलेले आहे, सुरत, जणू भ्रष्टाचार आणि कारस्थानांचा नरक, पण सुवर्णाने समृद्ध. सुरतवरील हल्ल्याने राजेंच्या सर्व समस्यांचे निराकरण होणार आहे. पण सुरत मुघल हद्दीच्या खूप आत वसलेले आहे, मुघल सुभेदार इनायत खान, पाच हजारांच्या प्रशिक्षित सुसज्ज फौजेसह त्याचे रक्षण करत आहे. स्वराज्य टिकून राहण्याची आशा आता या अशक्य वाटणाऱ्या मोहिमेवर अवलंबून आहे. याची आखणी गुप्तहेर संघटनेला करावी लागणार आहे ज्याचे नेतृत्व बहिर्जी नाईक आणि त्यांचा नवशिका सहकारी, शशिध्वज, एक सोळा वर्षाचा पोरगा करत आहे, जे ही मोहीम फत्ते करण्यासाठी त्यांना ठाऊक असलेल्या सर्व गोष्टींचा वापर करत आहेत. हे गुप्तहेर, इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलेल्या मुघल शत्रूच्या हद्दीत हालचाली करून राजेंचे सैन्य सुरतपर्यंत घेऊन जाऊ शकतील का? या शहराच्या राखणदारांवर मात करण्यासाठी ते काही युक्ती शोधतील का? यापेक्षा महत्वाचे, मराठी स्वराज्य विजयी होईल का? की, सार्वभौम मुघल साम्राज्याविरुद्ध उभ्या राहणाऱ्या इतर शेकडो लोकांप्रमाणे ते विनाश पावेल ?