-
Maza Nav Bhyrappa
एस. एल. भैरप्पा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले आणि मराठी वाचकांमध्येही लोकप्रिय ठरलेले एक अग्रगण्य कानडी कादंबरीकार. मानवी नात्यांमधली गूढ गुंतागुंत उकलून दाखवणारे आणि अवघा जीवनसंघर्ष सप्तरंगांमध्ये चितारणारे प्रतिभावंत साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असणार्या भैरप्पांचं हे प्रामाणिक आत्मचरित्र. जे जसं घडलं, ते तसं सांगणारं. नातेवाइकांपासून सहकार्यांपर्यंत सर्वांचीच - अगदी हितशत्रूंचीसुद्धा - आवर्जून दखल घेणारं. त्यांच्या आयुष्यातले आणि साहित्यिक जडणघडणीतले असंख्य चढउतार, यशापयश, सुखदुःखं... सारं काही वाचकांसमोर मांडून ठेवणारं. आत्मचरित्रांच्या दालनाची समृद्धी वाढवणारं एक पारदर्शी पुस्तक.
-
Samanyatil Asamanya (सामान्यांतले असामान्य)
सुधा मूर्ती यांचे नर्मविनोदी शैलीतलं वैशिष्ठ्यपूर्ण पुस्तक मराठीत! यातील सर्व व्यक्ती उत्तर कर्नाटकातल्या आहेत. त्यांचं स्वत:चं असं स्वतंत्र व्यक्तित्व आहे, तसेच ते सगळे इथल्या वौशिष्ट्यपूर्ण संस्कृती[...]
-
Ketkarvahini
गेल्या शतकाचा पूर्वार्ध. स्त्री-शिक्षणाची सुरूवात. शहरातली एक मुलगी लग्न करून कोकणातल्या एका दुर्गम खेड्यात गेली.उराशी सुंदर संसाराची स्वप्नं बाळगून. कडू-गोड अनुभवामधून जाताना तिच्या जीवनात वादळ आलं. आणि मग सुरु झला तिचा प्रतिकूल परिस्थितीशी झगडा. त्यातच मिसळली कायद्याची लढाई. ज्या कायद्याच्या लढाईत पतीची हत्या झाली, त्या युद्धभूमीला पाठ न दाखवता यशस्वीपणे लढत- झगडत राहणार्या केतकरवहिनींची कहाणी. गेल्या शतकातील स्त्रीजीवन आणि तिची आंतरिक शक्ती यांचं मनोज्ञ दर्शन घडवणारी वास्तव कहाणी. उमा कुलकर्णींच्या ओघवत्या शैलीत. त्यांची पहिलीच स्वतंत्र कलाकृती.
-
Parv (पर्व)
कर्नाटकातील अग्रगण्य कादंबरीकार तत्वचिंतक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी महाभारतावर लिहिलेली ही महाकादंबरी. यात मूळ महाभारतातील आभाळाएवढ्या उंचीच्या पात्रांचे वास्तव रूप रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय संकल्पनेच्या प्रकाशझोतात महाभारताच्या व्यक्तिरेखांची संगती भैरप्पांनी लावली आहे. या कांदबरीमध्ये लेखकाने संज्ञा प्रवाहाचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. कादंबरीतील पात्रांच्या मनात येणारे विचार व्यक्त होता होता शेवटच्या एक दोन शब्दांबरोबर विचारांचा प्रवाह वेगळ्याच दिशेला वाहू लागतो. कुंती, भीष्म, द्रोणाचार्य यांच्यासारख्या दीर्घायुषी पात्रांच्या वाढत्या वयाचा 'फील’ देण्यासाठी त्यांच्या अवाढ्य आयुष्याला गवसणी घालण्यासाठी लेखकाने याचा अत्यंत चतुराईने आणि कलात्मकतेने वापर करून घेतला आहे. महाभारतातील दैवी चमत्कार, वर, शाप या गोष्टींना भैरप्पांनी संपूर्ण फाटा दिला आहे. व प्रत्येक घटना, प्रसंगांचा अत्यंत वस्तुनिष्ठ अर्थ लावून वेगळ्या दृष्टीकोनातून ही कथा मांडली आहे. आधुनिक समाजातील व्यक्तीस 'महाभारतातील व्यक्ती अशाच असल्या पाहिजेत’ असे या कादंबरीमुळे वाटू लागले. भैरप्पांनी शापांच्या, वरदानांच्या भक्कम पडद्याआड लपलेल्या माणसाचा घेतलेला शोध वाचकांना विचारप्रवण करणारा ठरला आहे. 'पर्व’ प्रसिद्ध झाल्यापासून या कादंबरीवर उलट सुलट अनेक चर्चा घडल्या, आरोप-प्रत्यारोप केले गेले. परंतू तरीही पर्व महाभारताची एक विलक्षण प्रत्ययकारी अनुभव देणारी कलाकृती ठरली.
-
Dollar Bahu
फार विचित्र आहे हा देश ! ते एक रंगीबेरंगी कोळ्याचं जाळं आहे. तिथं नोकर्या आहेत, यंत्र-तंत्र आहे. सुख संपत्ती आहे, डॉलर्स आहेत. आपली माणसं त्यातल्या कशाला तरी बळी पडून तिथं येतात, पण माघारी जायला जमत नाही. तिथून जावं असा आपला देशही नाही. इथून बाहेर पडण्यासाठी शेकडो खिडक्या आहेत, पण आत बोलावणारा एकही दरवाजा नाही. तिथल्या जीवनाची तुम्हाला कल्पना नाही. सेलमध्ये खरेदी करायची आणि डॉलरला चाळीसनं गुणायचं ! असं जगणारी मंडळी सुखी असतात काय ? तिथं हजार डॉलर्समध्ये सामान्य काम करत राहायचं आणि इथं चाळीस हजार रुपये पगार मिळतो असं सांगून भाव खायचा. तिथं डॉलर मिळविण्यासाठी आम्ही आपली माणसं, घर-दार सगळं सोडून, तिथल्या थंडी-वार्याला तोंड देत तिथं राहतो, पण तिथल्या समाजाचं अविभाज्य अंग होऊ शकत नाही. फारच महाग पडतो हा डॉलर ! पण हे भारतात कुणालाही समजत नाही. पैशाच्या दलदलीत सापडलोय आम्ही ! आमच्या लायकीपेक्षा फार उत्तम नोकरी मिळते तिथे. जाती, भाषा, यांचं राजकारण नाही तिथे. सुखानं आपलं आपण काम करु शकतो. तिथलं सगळं सोडून मी इथं आलो तर आणखी दु:खी होईन.