-
Dongra Evdha (डोंगराएवढा)
प्रतिकूल परिस्थीती आणि निसर्गाशी दोन हात करत जगणारे गोपालय्या आणि त्यांना साथ देणारी पत्नी शंकरम्मा यांचे सहजीवन तसेच त्यांचा मुलगा त्या उभयतांना भेटायला येत नसल्याची हृदयातील वेदना व त्यांच्या कणखर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी मनोवेधक कादंबरी. मुळात कट्टद गोविंदय्या या व्यक्तीचं बोलणं, वागणं, सच्चेपणा आणि धीरोदात्त वृत्ती या कादंबरीच्या प्रेरणास्थानी आहे. लेखकाने त्यांच्या जीवनावर आधारित गोपालय्या हे पात्र साकारले आहे.
-
Gruhabhang (गृहभंग)
गृहभंग ही स्वातंत्र्यपूर्व भारतात 1920 ते 1940 सालादरम्यान घडणारी कादंबरी. याचं कथासूत्र एका चारी बाजूंनी समस्यांनी ग्रासलेल्या महिलेच्या, नंजम्माच्या संघर्षाभोवती फिरतं. मूर्ख नवरा, खाष्ट सासू, अंधश्रद्धाळू शेजार आणि भीषण गरिबी अशी ओढाताण सहन करत नंजम्माचा जीवनसंघर्ष सुरू आहे. नंजम्माची सासू प्रत्येक दुर्दैवाला नंजम्माला जबाबदार धरते. नवरा घरची जबाबदारी नाकारतो. अशात आपल्या निर्भेळ स्वभावानं आणि धैर्यानं नंजम्मा परिस्थितीवर मात करू पाहते. घरसंसार उभा करू पाहते. आत्मनिर्भरपणे उभं राहत असतानाच आपल्या मुलांना चांगलं आयुष्य आणि चांगले संस्कार देण्यास धडपडते. मानवी मनाच्या अतर्क्य व्यापारांमुळे आणि नियतीच्या घावांमुळे घायाळ झालेल्या नंजम्माची हदयाला पीळ पाडणारी कथा.
-
Kasheer (कशीर)
काश्मिरच्या धगधगत्या होमकुंडाला कथात्म साहित्यात गुंफत ही कादंबरी देशातला एक महत्त्वाचा विषय कुशलतेने हाताळते. एके काळी भारतीय संस्कृतीचं समृद्ध स्थळ असलेलं काश्मीर तेजोहीन होऊन आज म्लेछ धर्मापुढे का शरणागत झालं आहे, या तपशिलाचा शोध ही कादंबरी घेते. बशीर अहमद, त्यांचा मुलगा अन्वर, ड्रायव्हर सलीम यांसारखी धर्माच्या सीमा ओलांडून पाहणारी पात्रं, पुरातन वेदान्तात आजच्या समस्येवरचं उत्तर शोधणारे हृदयनाथ पंडित; काश्मीर सोडून जम्मूला आलेल्या बांधवांना लुटणारे हिंदू घरमालक, अशा अमानवी परिस्थितीत दांपत्य-जीवनाची फरफट होत असतानाही दांपत्य-जीवनातलं मूल्य जपणारे संजीव आणि आरती कौर अशा पात्रांच्या माध्यमातून काश्मीर नव्याने समजत जातो.
-
Sakshi. (साक्षी)
मानवी भावभावनांकडे अलिप्तपणे पाहिलं की आपल्या जाणिवांना खरे रुप गवसते. हा निरंतर संघर्ष या कादंबरीत परमेश्वरय्या यांच्या रूपाने अवतरला आहे. एका खोट्या साक्षीसाठी स्वतःला दोषी माननारे परमेश्वरय्या आत्महत्या करतात आणि यमसदनी पोहोचतात. पण त्यांना सूक्ष्मदेहाने पुन्हा पृथ्वीवर पाठवण्यात येत आणि त्यांचा भोवताल साक्षीभावाने पाहण्यास सांगितलं जातं. परमेश्वरय्यांचा हा प्रवास नकळत प्रत्येक मानवी मनात चाललेल्या संघर्षातं प्रतिनिधित्व करतो.
-
UTTARKAND (उत्तरकांड)
‘उत्तरकांड’ ही रामायणावर आधारित कादंबरी साकारली आहे सीतेच्या प्रथमपुरुषी निवेदनातून.. त्यामुळे रामायणातील घटना/प्रसंग तिच्या दृष्टिकोनातून उलगडतात. रामाची पत्नी म्हणून तिच्या वाट्याला जे भोग आले, त्याचं मनोविश्लेषणात्मक चित्रण या कादंबरीत केलं गेलं आहे. त्यामुळे राम-सीता-लक्ष्मणाबरोबरच रामायणातील अन्य व्यक्तिरेखाही पारंपरिक चौकट भेदताना दिसतात. सीतेच्या प्रथमपुरुषी निवेदनामुळे या कादंबरीत नाट्य निर्माण झालं आहे. या कादंबरीमुळे रामायणाचा एक नवा अन्वयार्थ समोर येतो.
-
Ashich Kahi Pana (अशीच काही पानं)
सरस्वतीबाई राजवाडे म्हणजे अद्भुत कादंबरीतल्या नायिका किंवा आकाशातून या भूतलावर अवतरलेल्या जणू शापग्रस्त अप्सराच! आपल्या असामान्य रूपामुळे काही काळासाठी त्या रंगभूमीवर झळकल्या. वाद्यवृंदाबरोबर गायिका म्हणून बालवयातच त्यांनी भारतभर प्रवास केला. पंधराव्या वर्षी त्या अंबिकापती रायशास्त्री राजवाडे या उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांनी श्रीमंत संसाराच्या सुखाबरोबरच एकान्तवासाचं दु:खही अनुभवलं. या कालखंडात त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्या. त्यांनी तमिळमध्ये पहिली कथा लिहिली. त्यानंतर त्यांनी कन्नडमध्ये कथा लिहायला सुरुवात केली. त्यांनी स्वत: स्त्रियांसाठी `सुप्रभात` नावाचं मासिकही चालवलं. सरस्वतीबार्इंचं जीवनचरित्र म्हणजे जीवनभर प्रेमाचा शोध घेत, एकाकी जगत एकान्ताकडे वळलेल्या एका जिवाची कथा!
-
Sanvadu Anuvadu (संवादु अनुवादु)
अनुवादाच्या क्षेत्रात उमातार्इंचा अनुभव खूपच दांडगा आहे. लग्नापर्यंतचा काळ बेळगावात गेल्याने कन्नड भाषा कळत होती, मात्र ती त्यांची बोली भाषा नव्हती. पती विरुपाक्ष मात्र कन्नड बोलणारेच होते. त्यांच्या नोकरीमुळे लग्नानंतर पुण्याच्या वास्तव्यात मित्र परिवारात सकाळ -संध्याकाळ फिरणे, बाहेर जेवणखाण आणि आपसात भरपूर गप्पा, हाच उद्योग होता. या वेळी एकमेकांच्या साहित्यप्रेमाची ओळख पटली. त्याच वेळी कन्नड साहित्यातील शिवराम कारंतांच्या कादंबरीला तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यापेक्षा कन्नड भाषेत निराळे काय आहे, याविषयी त्यांना औत्सुक्य होते. विरुपाक्षांनी कारंतांची ही कादंबरी वाचण्यासाठी मागवून घेतली, व त्यातील आशय जमेल तसा उमातार्इंना ते सांगू लागले. सहजच उमाताई त्याचं भाषांकन मराठीत कागदावर उतरवू लागल्या आणि हाच त्यांच्याकडून घडलेला पहिला अनुवाद. लहानपणच्या बेळगावातील वास्तव्याविषयी, तसेच नातेसंबंध, सामाजिक घडामोडी, याविषयीच्या अनुभवाविषयीचे कथन येते. आजूबाजूचा परिसर, मित्रमंडळी यांच्या प्रेमळ आठवणी, थोर साहित्यिकांच्या सहवासाचा, त्यांच्या स्वभावाचा समृद्ध करणारा अनुभवही कधी मिस्कीलतेने, कधी गंभीर भाष्य करून त्या सांगतात. आयुष्यात त्यांना भेटलेल्या विविध व्यक्तिरेखांच्या सवयी, स्वभाव बारकाईने सांगून त्यांची आपल्याशीही सहज भेट घडवतात. यात साहित्यिक लेखन, खाद्य पदार्थांची देवाणघेवाण, त्यांचा चित्रकलेचा छंद, नवीन गोष्ट शिकणे या सगळ्याची ओळख होते. नेहमीच्याच ओघवत्या शैलीतील हे वर्णन कन्नड संस्कृतीशी जोडून घेणारे, वाचकांना पुस्तकाशी गट्टी करायला लावणारे आहे. लेखिकेने आयुष्याच्या पूर्वार्धातील बेळगावातील वास्तव्याविषयी, नातेसंबंधांविषयी, सामाजिक घडामोडींविषयीचे कथन; तसेच, आजूबाजूचा परिसर, मित्रमंडळी यांच्या प्रेमळ आठवणी, थोर साहित्यिकांच्या सहवासाचा, त्यांच्या स्वभावाच्या समृद्ध करणाऱ्या अनुभवाविषयी केलेले मिस्कील, तर कधी गंभीरही भाष्य.
-
Floriston Bangla (फ्लॉरिस्टन बंगला)
'फ़्लॉरिस्टन बंगला' हि सत्य घटनेचा आधार असलेली कथा अभूतपूर्व आणि रोमांचकारी आहे . मरणोतर जीवनाच्या अस्तित्ववर जगाच्या प्रत्येक काना -कोपऱ्यातून काही ना काही मांडलं गेल आहे. त्यातील सत्य असत्येचा इथे शोध नाही ;परंतु प्रस्तुत कादंबरीतील अनुभव स्वत :अनुभवला आहे . सदेह नायक ,त्याची विदेही -प्रेयसी आणि त्या दोघांचा मित्र या तिघांमधील हृदय नात्याचा मोह वाचकांनाहि पडेल यात शंका नाही. श्रद्धा -अंधश्रद्धेच्या भोवऱ्यात न अडकता या कृतीतील कलात्मकतेचा आस्वाद वाचकांनी घ्यावा हि अपेक्षा .
-
Don Mhatare Ani Itar Katha (दोन म्हातारे आणि इतर क
धारवाड-हुबळी-हरिहर-गदग अशा उत्तर-मध्य कर्नाटकातील परिसरात या कथा घडतात. या भागातील निसर्ग आणि संस्कृती कवेत घेतानाच या कथेतील पात्र इथल्या माणसांची मानसिकता आणि श्रद्धा उराशी कवटाळून वावरताना दिसतात. कर्नाटक साहित्य अकादमी विजेते कथालेखक श्री. माधव कुलकर्णी समाजातील विविध स्तरांचे चित्रण करताना इथल्या सांस्कृतिक समृद्धीचाही दर्शन घडवतात. इथल्या जीवनाचे सत्य रंगवताना त्यातील कलात्मकतेला आणि चित्रमयतेलाही तितकेच प्राधान्य घेताना दिसतात. अनुवादित कथांचे दालन समृद्ध करणाऱ्या या कथा उमा वि. कुलकर्णी यांच्या ओघवत्या शैलीत.
-
Vrat Ani itar katha (व्रत आणि इतर कथा)
फकीर मुहम्मद कात्पदी यांची कथा आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहून आम्हाला अपरिचित असलेले मुस्लिम समाजातले चढ-उतार दाखवतात. तेही आधुनिकतेची कस न सोडता. या लेखनातून जाणवणारा मानवी स्पर्श आणि अंत:करणाची आद्रता वाचकाच्या मनाला भावल्याशिवाय राहत नाही. तसंच कुठलाही धर्म स्वत:पुरता असतो,तेव्हा काही अडचण नसते. ते धर्म समोरासमोर ठाकतात,तेव्हा त्यात राजकारण येते. हा सगळ्यांनाच येणारा अनुभव या कथा देतात.
-
Khelta Khelta Aayushya-Girish Karnad (खेळता खेळता
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते साहित्यिक गिरीष कर्नाड यांच्या ‘आडाडता आयुष्य’ या मूळ कन्नड भाषेतील आत्मचरित्राचा ‘खेळता खेळता आयुष्य’ या नावाने उमा कुलकर्णी यांनी केलेला मराठी अनुवाद.
-
Karvalo (कर्वालो)
सह्याद्रीच्या दक्षिण टोकाकडील निबिड अरण्यात चाललेल्या अद्भुतरम्य शोधयात्रेची रोमहर्षक कथा ! उडता सरडा ! एक दुर्मिळ प्राणी ! निसर्गाच्या कोट्यावधी वर्षांच्या वाटचालीत घडलेला एक 'अपघात' ! या उडत्या सरड्याच्या शोधयात्रेतील विविध स्तरावरचे यात्री ! गावंढळ मंदण्णा, इरसाल यंग्टा, चलाख 'किवी' कुत्रा पासून ते महान शास्त्रज्ञ कर्वालो ! निसर्गरम्य पाश्र्वभूमीवरील सशक्त, जिवंत, रसरशीत, नर्मविनोदी लेखन शैलीतून साकारलेली... कर्नाटकातील वेगळाच निसर्ग सामोरा आणणारी, पर्यावरणवादी, वैशिष्ट्यपूर्ण, बहुचर्चित कलाकृती !
-
Vanshvruksh ( वंशवृक्ष )
अपत्त्यावर पहिला अधिकार पित्याचा की मातेचा ? बीजाचा की क्षेत्राचा ? महाभारतात उद्भवलेला हा प्रश्न. डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी मन्वंतर काळाची पार्श्वभूमी घेऊन या प्रश्नावर चर्चा केली आहे. वेदविद्यापारंगत श्रीनिवास श्रोत्री भागीरथम्मा - लक्ष्मी, इतिहास संशोधक सदाशिव - नागलक्ष्मी करुणारत्ने आणि साहित्याचा प्राध्यापक राज - कत्त्यायनी नंजुंड यांच्या नातेसंबंधांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा हा प्रश्न कसाला लागतो तेव्हा भैरप्पांची प्रतिभा उच्च कोटीची रसनिष्पत्ती करते याचा अनुभव या कादंबरीत पानोपानी येतो. वंश सातत्त्याच्या कल्पनेला छेद देणारी कादंबरी. या कादंबरीला 1989 सालचा केंद्र साहित्य अकादमीचा 'अनुवाद पुरस्कार’ मिळाला आहे. त्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळातील समग्र अनुवादांचा विचार केला गेला होता. डॉ. भैरप्पांच्या मूळ कादंबरीतली रसोत्कटता अनुवादातही जशीच्या तशी ठेवण्याचं कौशल्य सौ. उमा वि. कुलकर्णी यांचं !
-
Mandra (मंद्र)
किती तरी वेळानंतर भोसलेचा आवाज ऐकू आला, "कलेच्या क्षेत्रात यांनं आपल्याला स्वर्ग भेटवला ! पण कलाकाराच्या अंतरंगात डोकावलं तर तिथं वेगळंच असतं. का हा विरोधाभास ?" "मलाही हाच प्रश्न अनेकदा छळत असतो !" कुलकर्णी म्हणाले. कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध... डॉ. एस.एल.भैरप्पा यांच्या प्रतिभासंपन्न नजरेतून !