Ashich Kahi Pana (अशीच काही पानं)
सरस्वतीबाई राजवाडे म्हणजे अद्भुत कादंबरीतल्या नायिका किंवा आकाशातून या भूतलावर अवतरलेल्या जणू शापग्रस्त अप्सराच! आपल्या असामान्य रूपामुळे काही काळासाठी त्या रंगभूमीवर झळकल्या. वाद्यवृंदाबरोबर गायिका म्हणून बालवयातच त्यांनी भारतभर प्रवास केला. पंधराव्या वर्षी त्या अंबिकापती रायशास्त्री राजवाडे या उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांनी श्रीमंत संसाराच्या सुखाबरोबरच एकान्तवासाचं दु:खही अनुभवलं. या कालखंडात त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्या. त्यांनी तमिळमध्ये पहिली कथा लिहिली. त्यानंतर त्यांनी कन्नडमध्ये कथा लिहायला सुरुवात केली. त्यांनी स्वत: स्त्रियांसाठी `सुप्रभात` नावाचं मासिकही चालवलं. सरस्वतीबार्इंचं जीवनचरित्र म्हणजे जीवनभर प्रेमाचा शोध घेत, एकाकी जगत एकान्ताकडे वळलेल्या एका जिवाची कथा!