-
Hidden In Plain Sight (हिडन इन प्लेन साईट)
HIDDEN IN PLAIN SIGHT IS THE SECOND BRILLIANT AND CAPTIVATING NOVEL FEATURING WILLIAM WARWICK BY THE MASTER STORYTELLER AND BESTSELLING AUTHOR OF THE CLIFTON CHRONICLES, JEFFREY ARCHER.NEWLY PROMOTED, DETECTIVE SERGEANT WILLIAM WARWICK HAS BEEN REASSIGNED TO THE DRUGS SQUAD. HIS FIRST CASE: TO INVESTIGATE A NOTORIOUS SOUTH LONDON DRUG LORD KNOWN AS THE VIPER.BUT AS WILLIAM AND HIS TEAM CLOSE THE NET AROUND A CRIMINAL NETWORK UNLIKE ANY THEY HAVE EVER ENCOUNTERED, HE IS ALSO FACED WITH AN OLD ENEMY, MILES FAULKNER. IT WILL TAKE ALL OF WILLIAM’S CUNNING TO DEVISE A MEANS TO BRING BOTH MEN TO JUSTICE; A TRAP NEITHER WILL EXPECT, ONE THAT IS HIDDEN IN PLAIN SIGHT . . . FILLED WITH JEFFREY ARCHER’S TRADEMARK TWISTS AND TURNS, HIDDEN IN PLAIN SIGHT IS THE GRIPPING NEXT INSTALMENT IN THE LIFE OF WILLIAM WARWICK. IT FOLLOWS ON FROM NOTHING VENTURED, BUT CAN BE READ AS A STANDALONE STORY.
-
Hamid
सीमेपलीकडून झालेल्या विश्वासघातामुळे हमीद अन्सारीच्या आयुष्याचं पार वाटोळं होणार होतं. वाचलंच पाहिजे असं पुस्तक- राज चेंगप्पा कहाणीतील प्रत्येक वळण हृदयाचा ठोका थांबवणारं आहे. खूपच उत्तम प्रकारे सांगितलेली कहाणी. - सुहासिनी हैदर तुमच्या हृदयाच्या तारा छेडणारी मनोवेधक कहाणी - राजदीप सरदेसाई नोव्हेंबर, २०१२ मध्ये २७ वर्षांचा मुंबईकर आयआयटी तज्ज्ञ हमीद अचानक कुठंतरी गायबच झाला. काय घडलं होतं त्याच्या बाबतीत ? तो गेला होता तरी कुठं? त्याच्या पालकांना एवढंच ठाऊक होतं की आपला मुलगा अफगाणिस्तानात काबूल इथे नोकरीच्या निमित्ताने गेला आहे. थोडी शोधाशोध केल्यावर त्यांना कळलं की आपला मुलगा सीमेपलीकडील काही पाकिस्तानी दोस्तांसोबत खास करून एका पाकिस्तानी मुलीसोबत चॅटिंग करत होता. हमीद अन्सारी आणि गीता मोहन यांनी अगदी आतल्या गोटातून आणि अधिकारवाणीने असं हे लेखन केलं आहे. वाणी प्रथेखाली जबरदस्तीने लग्न लावून दिलं जाणार होतं म्हणून एका मुलीला सोडवण्यासाठी जाणाऱ्या हमीदला दोन देशांतल्या सीमारेषा लक्षातही घ्याव्याशा वाटल्या नाहीत. त्याला कशाचीही भीती वाटली नाही, कसलीही आडकाठी त्याला झाली नाही परंतु पाकिस्तानातील त्याच्या मित्रांनीच त्याला दगाफटका केला. त्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्याचा निर्धार मोडून काढून त्याच्यावर गुप्तहेर असा शिक्का मारण्यासाठी जंग जंग पछाडलं. त्यानंतर पुढे काय झालं तर या उलट तपासणीच्या काळात सोसावा लागलेला छळ, एकांतवासात कोठडीत जखडून राहण्याची सजा आणि त्यातूनही तग धरून राहण्यासाठी केलेला संघर्ष. भारतात त्याची आई फौजिया अन्सारी यांनीही अथक लढा दिला. अगणित दारं त्यांनी मदतीसाठी ठोठावली आणि हमीदला परत आणण्यासाठी तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मदतीने भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांना गदगदा हलवून सोडलं. १८ डिसेंबर २०१८ रोजी सरतेशेवटी हमीदनं भारताच्या भूमीला स्पर्श केला. अत्यंत जिगरबाज, हृदयद्रावक आणि गतिमान अशी ही कहाणी माणुसकी, प्रेम, विश्वासघात आणि विपरित परिस्थितीतही आशा जागृत ठेवणं म्हणजे काय चीज असते, याविषयी आपल्याला खूप काही सांगून जाते.
-
Maya Modi Azad (माया मोदी आझाद)
भारतीय राजकारणातल्या दलित पटलामुळे विश्लेषणात्मक कठीण कोडं समोर येतं. गेल्या दशकात बहुजन समाज पक्षाला लागलेली ओहोटी, त्याच जोडीने भारतीय जनता पक्षाने पुनरुज्जीवीत केलेल्या हिंदुत्वाकडे वळलेला दलितांचा एक विभाग आणि नव्या दलित संस्थांनी अत्याचार आणि उजव्या विचारसरणीच्या वर्चस्वाविरुद्ध सुरु केलेली निदर्शनं. अशा प्रकारे आज दलित राजकारणावर दोन विरुद्ध पद्धतींचा ठसा उमटलेला दिसतो - उजव्या विचारसरणीविरुद्ध राजकीय निदर्शनं आणि तरीही निवडणुकीत उजव्या विचारसरणीकडे असलेला कल. बदलत्या सामाजिक-राजकीय संदर्भाला दलित वक्तव्याने कसा प्रतिसाद दिला आहे हे या पार्श्वभूमीवर लक्षात घेतलं पाहिजे. विशेषकरून उत्तर प्रदेशावर लक्ष केंद्रित करत 'माया, मोदी, आझाद' या सदर पुस्तकात बदलत्या प्रवाहाचा आढावा घेतला आहे. या राज्यात दलितांना गाभ्याशी ठेवत मायावतींनी नवी 'अम्ब्रेला पार्टी' निर्माण करायचा प्रयत्न केला. नंतरच्या काळात नरेंद्र मोदी यांनी दलितांच्या एका भागाला भगव्या कळपाकडे आकर्षित केलं. गेल्या दोन दशकांत या दोघांनी या राज्यात दलित राजकारणाला आकार दिला आहे. याच राज्यातून नवे दलित नेते चंद्रशेखर आझाद हे हिंदुत्व वर्चस्व आणि बसप यांना आव्हान देत दलित चळवळीचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करत आहेत. सन २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे स्पष्ट विभागणी होऊ शकते हे लक्षात घेतलं, तर या त्रिकोणी स्पर्धेचं सुधा पै आणि सज्जन कुमार यांनी केलेल्या चपखल आणि आंतरदृष्टी जोपासणाऱ्या विश्लेषणातून केवळ दलितांचंच नाही, तर संपूर्ण भारताच्या लोकशाहीचं राजकारण समजून घेता येईल.
-
Gulzar Patkatha-Aandhi,Achanak,Kitab,Mausam (गुलज़ा
गुलजारांनी 1971 साली त्यांचा पहिला सिनेमा दिग्दर्शित केला. हा पहिला सिनेमा होता ज्याची पटकथा आणि दिग्दर्शन दोन्ही गुलजारांनी केलं होतं. यानिमित्तानं बॅलीवूडमध्ये एका तरल भावस्पर्शी कथांच्या चित्रपटांचा पटच सुरु झाला. गुलजारांच्या लेखनीतून 19 पटकथा अवतरल्या, ज्यांना पडद्याचा दृश्यरुपी आयामही स्वतः गुलजारांनीच दिला. या कथांमध्ये निव्वळ रुपेरी पडद्यावरचं नाट्य नव्हतं, तर त्यात प्रगल्भ साहित्यमुल्य होतं. म्हणूनच या कथा रसिकवाचकांना परकायाप्रवेशाचा परम आनंद देऊ शकतात. यात मेरे अपने, परिचय, कोशिश,अचानक,आंधी,किताब,खुशबू,मीरा,मासूम,मौसम,अंगूर,लिबास,लेकिन,हुतूतू,माचिस,इजाजत,न्यू देहली टाईम्स, नमकिन आणि किनारासारख्या पटकथांचा समावेश आहे. सामाजिकतेच्या चक्रात बाधित होणाऱ्या नातेसंबंधांचं प्रतिबिंब या कथांमध्ये उतरतं. भावनांमधला सच्चेपणा आणि राजकारणानं ग्रासणारं प्रेम यात भेटतं. लिबासमध्ये विवाहबाह्य संबंध आणि त्यातून होणारी नातेसंबंधांची घालमेल दिसते. तर मासूममध्ये अशाच प्रकारच्या संबंधांमुळं होरपळलेल्या चिमुरड्यांचं भावविश्व दिसतं. माचिसमध्ये दहशतवादाशी लढा देणारा पंजाबी तरुण भेटतो, तर हुतूतूमध्ये देशाला ओरबाडणाऱ्या भ्रष्टाचाराचं अस्वस्थ करणारं चित्रण दिसतं. मुकबधिरांचा संवादासाठीचा कोशिशमधला संघर्ष डोळ्यात अंजन घालतो तर शेक्सपिअरच्या द कॅमेडी आफ एरर्सवर आधारलेला अंगूर निर्मळ विनोदाची यथेच्छ अनुभूती देतो.
-
Gulzar Patkatha-Kinara,Lekin,Namkeen (गुलज़ार पटकथा
गुलजारांनी 1971 साली त्यांचा पहिला सिनेमा दिग्दर्शित केला. हा पहिला सिनेमा होता ज्याची पटकथा आणि दिग्दर्शन दोन्ही गुलजारांनी केलं होतं. यानिमित्तानं बॅलीवूडमध्ये एका तरल भावस्पर्शी कथांच्या चित्रपटांचा पटच सुरु झाला. गुलजारांच्या लेखनीतून 19 पटकथा अवतरल्या, ज्यांना पडद्याचा दृश्यरुपी आयामही स्वतः गुलजारांनीच दिला. या कथांमध्ये निव्वळ रुपेरी पडद्यावरचं नाट्य नव्हतं, तर त्यात प्रगल्भ साहित्यमुल्य होतं. म्हणूनच या कथा रसिकवाचकांना परकायाप्रवेशाचा परम आनंद देऊ शकतात. यात मेरे अपने, परिचय, कोशिश,अचानक,आंधी,किताब,खुशबू,मीरा,मासूम,मौसम,अंगूर,लिबास,लेकिन,हुतूतू,माचिस,इजाजत,न्यू देहली टाईम्स, नमकिन आणि किनारासारख्या पटकथांचा समावेश आहे. सामाजिकतेच्या चक्रात बाधित होणाऱ्या नातेसंबंधांचं प्रतिबिंब या कथांमध्ये उतरतं. भावनांमधला सच्चेपणा आणि राजकारणानं ग्रासणारं प्रेम यात भेटतं. लिबासमध्ये विवाहबाह्य संबंध आणि त्यातून होणारी नातेसंबंधांची घालमेल दिसते. तर मासूममध्ये अशाच प्रकारच्या संबंधांमुळं होरपळलेल्या चिमुरड्यांचं भावविश्व दिसतं. माचिसमध्ये दहशतवादाशी लढा देणारा पंजाबी तरुण भेटतो, तर हुतूतूमध्ये देशाला ओरबाडणाऱ्या भ्रष्टाचाराचं अस्वस्थ करणारं चित्रण दिसतं. मुकबधिरांचा संवादासाठीचा कोशिशमधला संघर्ष डोळ्यात अंजन घालतो तर शेक्सपिअरच्या द कॅमेडी आफ एरर्सवर आधारलेला अंगूर निर्मळ विनोदाची यथेच्छ अनुभूती देतो.
-
Mrutyukatha (मृत्यूकथा)
‘मृत्यू कथा’ हे वास्तववादी लेखन प्रकारातील एक उल्लेखनीय असेच पुस्तक आहे, असे म्हणावे लागेल. अत्यंत बारकाईने घेतलेली माहिती, चिकित्सकपणे शोधलेले मर्म यामुळे हे वाचन वाचकास समृद्ध करून जाते. या गतिमान, सहानुभूतिपूर्ण, धाडसी आणि कधी कधी तर रक्तच गोठवून टाकेल, अशा पुस्तकातून बस्तरचा प्रत्यक्ष परिसर, कथानकातील पात्रे, तेथील नागरी युद्धाचे सामाजिक परिणाम या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर जिवंत होऊन उठतात. यातील निवेदकाचे पात्र उगाच घुसडलेले कधीच वाटत नाही. उलट त्याच्या सदसद्विवेकबुद्धीमुळे त्याची उपस्थिती वाचकाला विश्वासार्ह वाटते आणि त्याच्यातील साहित्यगुणांमुळे तर तो प्रशंसनीयच ठरतो.
-
Rahul Bajaj (राहुल बजाज)
लेखिकेने या पुस्तकातून राहुल बजाज आणि त्यांचे विविध घडामोडींनी भरलेले खळबळयुक्त जीवन यांचे कसलाही आडपडदा न ठेवता चित्रण केले आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राहुल बजाज यांच्या आई तुरुंगात गेल्या होत्या, त्या प्रसंगापासून कहाणी सुरू होते आणि नव्या आशा मनाशी बाळगणाऱ्या एका स्वतंत्र देशातील प्रारंभीचे जीवन कसे होते, त्याची झलकच आपल्याला मिळू लागते. नवनव्या ‘स्टार्ट अप्स'च्या युगात ‘हमारा बजाज'च्या मागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या माणसाच्या शाश्वत वारशाचे चित्रण गीता पिरामल यांनी अत्यंत कौशल्याने केले आहे. अत्यंत बारकाईचे निरीक्षण आणि सखोल अंतर्दृष्टी यांच्या जोडीला या चरित्रात कुटुंब, व्यवसाय आणि सार्वजनिक जीवन यांविषयीचे आणि समाजवस्त्रावर कधीही पुसला न जाणारा असा आपला छाप अंतिमतः कसा सोडून जावा याविषयीचे अतुलनीय धडेही चटकदार शैलीत दिले आहेत.
-
Nothing Ventured (नथिंग वेंचर्ड)
"जेफ्री आर्चर यांच्या नव्या संडे टाईम्स बेस्ट सेलर्स मालिकेची सुरुवात `नथिंग व्हेंचर्ड` या पुस्तकाने होत आहे. पोलिसात भरती झाल्यानंतर विल्यम नवोदित तपास अधिकारी म्हणून स्कॉटलंड यार्डच्या कला आणि प्राचीन कलावस्तू दलात सामील होतो. इथे प्रथमच तो एका मोठ्या प्रकरणाची उकल करतो. फिट्झमोलियन म्यूझिअममधील रेंब्रांच्या एका अमूल्य चित्राच्या चोरीचा तपास तो करत असतो. याच काळात बेथ रेन्सफोर्ड या तिथल्या संशोधन साहाय्यकेशी त्याची भेट होते. तो तिच्या प्रेमात पडतो. बेथकडेही एक गुपित असतं. हरवलेल्या चित्राचा मागोवा घेताना विल्यमची गाठ माइल्स फॉकनर या संभावित चित्रसंग्राहकाशी आणि त्याचा चलाख वकील बूथ वॉट्सन (क्यूसी) यांच्याशी पडते. विल्यमच्या एक पाऊल पुढे राहाण्यासाठी ते दोघे कायदा अगदी मोडेल इतका ताणण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे माइल्स फॉकनरची पत्नी ख्रिस्टिना मात्र विल्यमशी मैत्री करते; पण ती नक्की कुणाच्या बाजूने असते? विल्यम वॉरिक या कुटुंबवत्सल आणि करामती तपास अधिकाऱ्याच्या जीवनाची ही कथा आहे. विल्यम आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये शक्तिमान गुन्हेगारी शत्रूंशी चतुरपणे आणि हिकमतीने लढतो. "