A Matter Of Honour (अ मॅटर ऑफ ऑनर)

अ‍ॅडम स्कॉट हा ब्रिटिश लष्करातून लवकर निवृत्ती घेतलेला तरुण. झारचं राजचिन्ह अ‍ॅडमच्या हातात येतं; पण त्याच राजचिन्हाच्या मागे असतो रोमानोव्ह नावाचा रशियन तरुण. अमेरिका आणि इंग्लंडलाही ते हवं असतं. रोमानोव्ह अ‍ॅडमच्या मैत्रिणीचा खून करतो; पण स्थानिक पोलीस अ‍ॅडमला तिचा खुनी समजतात आणि त्याच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागतो. मग पोलीस, रोमानोव्ह आणि अन्य शत्रूंपासून वाचण्यासाठी अ‍ॅडम राजचिन्हासह धावत सुटतो. कधी एखादी ऑर्केस्ट्रातील कलाकार त्याला मदत करते, तर कधी एखादी शेतकरी स्त्री, कधी एखादा सद्गृहस्थ त्याला लिफ्ट देतो, तर कधी एखादी वारांगना त्याच्या उपयोगी येते. या प्रवासात त्याच्यावर गोळ्याही चालवल्या जातात. तो जखमीही होतो; कधी गाड्या चोरून त्यातून पलायन करतो, कधी एखाद्या पडावावर चढतो; पण एका क्षणी तो रोमानोव्हच्या तावडीत सापडतो; पण त्यावेळी त्याच्याकडे राजचिन्ह नसतं. सुटतो का तो रोमानोव्हच्या तावडीतून? ते राजचिन्ह कुठे असतं?

Book Details

ADD TO BAG