-
Shantidoot ( शांतिदूत)
शांती ही विलक्षण गोष्ट आहे आणि स्वातंत्र्य अत्यंत पवित्र. 'कार्डिनल्स' आणि 'नीलपंखी' जे पक्षी आपापसात लढाया करतायत. संभ्रमात पडल्यामुळे नीलपंखी जे पक्ष्याला डगमगायला झालं. त्याला आपली तलवार लहानग्या कार्डिनलच्या मानेवर उतरवताच आली नाही. कार्डिनलने आपले डोळे मिटले आणि तलवारीच्या वाराची वाट पहात त्याने मान आक्रसून घेतली... नॅन्सी यी फान सहावीत असताना क्रांतियुद्धं, दहशतवाद आणि 9/11 च्या घटनेचा अभ्यास करत होती. त्याच रात्री तिला लढाई करत असलेल्या पक्ष्यांबद्दलचं धडकी भरवणारं स्वप्न पडलं. दुस-याच दिवशी तिने विश्वशांतीचा संदेश देण्याकरता कादंबरी लिहायला सुरुवात केली. अवघ्या बारा वर्षांच्या या अत्यंत बुद्धिमान बाललेखिकेने मैत्री आणि साहस या गुणांच्या जोरावर जुलमावर कशी मात करता येऊ शकते, ते या सशक्त कादंबरीतून दाखवून दिलेलं आहे.