-
Upchar Tan Manache (उपचार तन मनाचे)
सर्वांगीण विचार करता असे दिसते की, वैद्यकशास्त्राकडे पाहण्याच्या आधुनिक भौतिक विचारपद्धतीमुळे आपण जे काही करू शकतो, ते केवळ चमत्कार या श्रेणीत बसवावे असेच असते. प्रतिजैविके वापरून आपण जंतुसंसर्ग नाहीसा करू शकतो, रासायनिक उपचारांनी कर्करोगावर उपचार करू शकतो, पोलिओ, गोवर, कांजिण्या यांच्यापासून तसेच काही प्राणघातक रोगांपासून मुलांना वाचवू शकतो, रोगग्रस्त अवयव बदलू शकतो. मात्र, आपले मन हे सगळ्या रोगांवरचा रामबाण उपाय आहे; तसेच आपला आत्मविश्वास आणि आशा औषधापेक्षा अधिक चांगले कार्य करतात. साहजिकपणे आपले शरीर विविध रोगांसंदर्भात आणीबाणीचा सामना करत असताना आपल्यावर कमी ताण येतो आणि आपले शरीर स्वत:ची दुरुस्ती आणि वाढ यांच्याकडे अधिक लक्ष पुरवते. या एकाच मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे त्यांनी अनेक रोगांवरील नानाविध उपचारपद्धतींचा सखोल अभ्यास केला. मन आणि शरीर यांच्यावर एकत्रितपणे केल्या जाणार्या उपचारांबद्दल मिळालेली ही समग्र माहिती त्यांनी या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आणली आहे.
-
Nate Bramhandache (नाते ब्रह्मांडाचे)
मानवजातीच्या इतिहासामध्ये माणसाचे आणि ताऱ्यांचे कायमच एक घट्ट नाते राहिले आहे. कधीकाळी आपल्या धार्मिक श्रद्धांवर, सत्तेच्या संरचनांवर, वैज्ञानिक प्रगतीवर आणि अगदी आपल्या जीवशास्त्रावर सुद्धा ताऱ्यांचा कितीतरी प्रभाव होता. पण मागील काही शतकांपासून आपल्या भोवतालच्या अवकाशापासून आपण स्वतःला दूर ठेवले आहे. आणि त्याची किंमत आपल्याला मोजावी लागते आहे, लागणार आहे. हे पुस्तक म्हणजे एक इतिहासाची सफर आहे. इतिहास कशाचा? तर लासकॉक्स गुहेतील आदिमानवाने काढलेल्या बैलांच्या चित्रांपासून ते ताहितियन नावाडी ताऱ्यांचा दिशादर्शकासारखा उपयोग करून प्रवास करू लागले तिथे पर्यंत. मध्ययुगीन साधू `काळाच्या` प्रकृतीला आव्हान देऊ लागले तिथपासून ते अवकाश आणि वेळ एकच असल्याचा आईनंस्टाईनला शोध लागला तिथेपर्यंत सगळ्याचा सोप्या आणि रंजक भाषेत सांगितलेला हा इतिहास आहे. लेखक असे सुचवतो आहे की आपण ज्या अवकाशाचा भाग आहोत ते अवकाश, त्याचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम, त्यातील संभाव्य प्रेरणा आणि अविष्कार यांचा आपण नव्याने शोध घेतला पाहिजे.