-
Stock Market Madhun Mi 10 Koti Kase Kamavale (स्टॉ
निम्म्या मिलियन डॉलर्सच्या बातमीने मला विलक्षण आत्मविश्वास मिळाला. मी हे कसं साध्य केलं, ते मला व्यवस्थित माहीत होतं आणि मी पुन्हा हे करू शकेन याची मला खात्री होती. मी एकप्रकारे या कलेत प्रावीण्य मिळवलं होतं, यात शंका नव्हती. टेलिग्राम संदेशांच्या दुनियेत काम करत असतानाच मी एकप्रकारे सहावं इंद्रिय विकसित केलं होतं. एखाद्या जाणत्याप्रमाणे मी माझ्या शेअर्सविषयी सर्वकाही अनुभवू शकत असे. स्टॉक्स कसे चालतील याविषयी मी अचूक सांगू शके. जर आठ अंक पुढे सरकलेला शेअर चार अंकापर्यंत घसरला तरी मी अस्वस्थ होत नसे. माझ्या अपेक्षेप्रमाणे ते ठीकच असे. जर एखादा शेअर मजबूत व्हायला लागला तर त्याची वाढ कोणत्या दिवशी होणार याचा मला पुरेपूर अंदाज येई. हे एक रहस्यमय आणि न उलगडता येणारं सामर्थ्य नि:संशय माझ्यामध्ये होतं. त्यामुळे एका जबरदस्त शक्तीच्या भावनेनं मी भारला गेलो होतो. - याच पुस्तकातून प्रस्तुत पुस्तक निकोलस डरवास यांची असफलता, संघर्ष आणि अखेर अभूतपूर्व यश या प्रवासाविषयी सांगते, जिथे त्यांनी केवळ साडेसहा वर्षांच्या काळात दहा कोटींपेक्षा अधिक रुपये कमावले. लक्षात घ्या, ही 1950च्या दशकातली कमाई आहे. स्टॉक मार्केटमधल्या असामान्य यशाची ही अद्वितीय कहाणी गुंतवणूकदारांना आत्मविश्वास देते. सुयोग्यरीत्या गुंतवणूक करून आपली कमाई वाढवण्याचे व्यावहारिक सूत्र सांगते.
-
Antaralatil Netradipak Mahila (अंतराळातील नेत्रदीप
जगाच्या अंतराळ संशोधनातील कामगिरीचा मागोवा घेताना मानवी इतिहासातील या महत्त्वाच्या क्षेत्रांत आपल्यालाही सहभाग नोंदवता यावा यासाठी प्रदीर्घ लढा दिलेल्या महिलांच्या चरित्रात्मक कथांच्या माध्यमातून आपण जणू अवकाशाचीच सफर करणार आहोत. या पुस्तकातील दहा चरित्रकथांची सुरुवात झाली कित्येक वर्षांपूर्वी. आकाशातील तारकापुंजांचा नकाशा तयार करण्याच्या कामात सहभाग घेणार्या, अवकाशातील परिस्थितीचा मानवी शरीरावर काय परिणाम होऊ शकतो हे तपासणार्या सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये सहभाग नोंदवणार्या आणि अवकाशात पाऊल ठेवत इतिहास घडवणार्या अशा अनेक अवकाशनायिकांना तुम्ही या पुस्तकात भेटाल. या महिलांनी तारकांपर्यंत पोहोचण्याचं जे झगमगतं स्वप्न पाहिलं, ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी कशा चित्तथरारक मोहिमा हाती घेतल्या, त्यात त्यांना कोणती आव्हानं पेलावी लागली, यामधून त्यांच्या अंतराळविषयक ज्ञानात कशी भर पडत गेली, अवकाशातील गमतीजमती त्यांना कशा अनुभवता आल्या याची वेधक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल.