-
Spy Stories-Mi Pakistanatil Bhartacha Her (स्पाय स्टोरीज-मी पाकिस्तानातील भारताचा हेर)
मी पाकिस्तानातील भारताचा हेर | स्पाय स्टोरीज | सत्य घटनांवर आधारित गुप्तचर कथा लेखक : मोहनलाल भास्कर अनुवाद : ऋजुता कर्णिक गुप्ते मोहनलाल भास्कर हे भारतीय हेर… त्यांची ही जीवनकहाणी. ‘हेरगिरी’ या विषयावर विशेष प्रकाश टाकते. या पुस्तकात १९६५च्या भारत-पाक युद्धादरम्यान त्यांचा पाकिस्तानात झालेला प्रवेश, तिथे त्यांचं पकडलं जाणं आणि पर्यायाने त्यांनी भोगलेल्या दीर्घकालीन तुरुंगयातनांचं चित्रण त्यांनी केलं आहे. परंतु ही साहित्यकृती केवळ साहस व दुर्दम्य निग्रह यांचं वर्णन करत नसून ती पाकिस्तानच्या तत्कालीन परिस्थितीचंही विश्लेषण करते. पुस्तकात मोहनलाल पाकिस्तानातलं भुट्टोप्रणित तथाकथित लोकशाही सरकार, निरंतर मजबूत होत जाणारे हुकूमशहा यावर भाष्य करतात, तसेच धार्मिक कट्टरतावाद आणि त्याला विसंगत असणारे सामाजिक-आर्थिक पैलू उलगडून दाखवतात. भारतविरोधी षड्यंत्र रचणाऱ्या पाकिस्तानातल्या विविध आंतरराष्ट्रीय सूत्रांबद्दलही ते इथे विवेचन करतात. मोहनलाल एकीकडे पाकिस्तानी तुरुंगांची नरकप्राय स्थिती, तुरुंग अधिकाऱ्यांचं अमानुष वर्तन यांचं वर्णन करतात तर, दुसरीकडे ते पाकिस्तानी जनता आणि मेजर सिपरा यांच्यासारख्या व्यक्तींची माणुसकीची वागणूक रेखांकित करायलाही विसरत नाहीत. हेरगिरीचं अंतरंग दाखवणारं विश्वासार्ह पुस्तक…
-
Mazi Pakistanatil Heragiri (माझी पाकिस्तानातील हेर
देशांमधील हेरगिरी हा तेथील गुप्त मिळवण्याचे एक माध्यम आहे. हेर असणारे लोक जीवावर उदार होऊनच दुसऱ्या देशात जातात. त्यात ते देश जर भारत पाकिस्तान असतील तर हेरगीरीला अनेक पदर असतात. मोहनलाल भास्कर यांनी पाकिस्तानात जाऊन तथील आण्विक योजनेची माहिती मिळविण्याचे जोखमीचे काम स्वीकारले. विवाह होऊन काही महिनेच झालेले मोहनलाल कुटुंबियांना सोडून पाकिस्तानला गेले. तेथे मुहम्मद असलम नावाने म्हशींचा व्यापारी बनून त्यांनी हेरीगिरीचे काम सुरु केले; पण एका सहकाऱ्याच्या फितुरीमुळे ते पकडले गेले. तुरुंगामधील यातनामय जीवनाचे चित्रण त्यांनी 'माझी पाकिस्तानातील हेरगिरी' मध्ये केली आहे. १९६५ मधील भारत - पाकिस्तान दरम्यानचे युद्ध, तेथील सामाजिक स्थिती, नागरिक, जनरल याह्याखान, पंतप्रधान भुट्टो, बांगलादेशचे शेख मुजीबुर्रहमान यांच्या विषयीचे अनुभव, तुरुंगातील डाकू, वेश्या, दलाल यांच्या आठवणी, राजा गुल अनार खान यांनी केलेली मदत असे १४ वर्षांतील 'वनवासा'तील वास्तव प्रसंग त्यांनी यात लिहिले आहेत. याचा मराठी अनुवाद संजीवनी शिंत्रे यांनी केला आहे.