-
Marg Yashacha, Marg Sukhacha(मार्ग यशाचा, मार्ग सु
आपल्या सहवासात असलेले आपले मित्र, नातेवाईक किंवा शेजारी असे अनेक जण आपण पाहत असतो की, त्यांनी अनेक प्रकारे व प्रचंड प्रमाणात आर्थिक, सामाजिक यश मिळवले आहे; तरीही ते समाधानी असतातच असे नाही. माणसाची सर्वोच्च प्राथमिकता समाधान हीच असायला पाहिजे. आर्थिक, सामाजिक किंवा अन्य यश मिळवतानाच समाधान मिळवणे शक्य असते. त्यासाठी जगभरचे मानसशास्त्रज्ञ, व्यक्तिमत्त्वविकासतज्ज्ञ प्रचंड प्रयत्न करत आहेत. त्यावर शेकडो पुस्तके प्रकाशित झाली आहेत, शेकडो प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. अर्थात, यांतले बहुसंख्य प्रशिक्षण कार्यक्रम आणि पुस्तके इंग्रजीत आहेत आणि ती पाश्चात्त्य मानसिकतेचा विचार करून लिहिलेली आहेत. मराठीत याची पोकळी जाणवत होती. ‘मार्ग यशाचा, मार्ग सुखाचा’ हे पुस्तक ही उणीव भरून काढते. जर तुम्ही तुमच्या स्वभावातल्या छोट्या छोट्या गोष्टी बदलल्या, तर संपूर्ण व्यक्तिमत्त्व बदलते आणि यशासोबत समाधानही लाभते, हे सांगणारं अतिशय उपयुक्त, साध्या सरळ सोप्या भाषेतलं, मराठी वाचकांना थेट भिडणारं हे लिखाण. कोणताही बदल सहजी स्वीकारण्याची माणसाची तयारी नसते. ज्यांना कुणाला जाणवतंय की, मला आता बदलणं आवश्यक आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे, मार्गदर्शक आहे आणि लगेच परिणाम दाखवणारं आहे.