-
Savalya Vitthalachya Deshat (सावळ्या विठ्ठलाच्या द
वर्षाताईंचा मुलगा धनंजय केनिया देशात नोकरीनिमित्त गेला तेव्हा त्याच्याबरोबर त्याची पत्नी प्राची, त्यांचा छोटासा अहान आणि वर्षाताई असे सगळेच केनियाला गेले. एका संपूर्णपणे अनोळखी देशात, अनोळखी संस्कृतीत, मनातलं कुतूहल कायम जागतं ठेवणाऱ्या वर्षाताईंनी तिथलं संस्कृती विश्व, त्याची वैशिष्ट्यं टिपली नसती तरच नवल! त्या स्वतःही पुस्तकात अगदी सहज याचा उल्लेख करून जातात 'जेवढी म्हणून इथली माहिती मिळतेय ती जमवायला आवडतेय मला. वर्षाताई, तुमच्या शब्दांची, लेखनाची शक्ती अशी, की आम्ही तिथं न जाताही आम्हाला आता हा परिसर, प्रांत आपलासा वाटू लागलाय. सावळा विठ्ठल असाच आहे. 'पंढरीला न जाताही तो प्रत्येकाला आपलासा वाटतो. तिथं जाऊन आलेली, उराउरी भेटून आलेली मंडळी भावभारित असं त्याचं जे वर्णन करतात त्यामुळे त्या सावळ्याबद्दलचं प्रेम अधिकच वाढतं.' तुम्ही त्या रंगाने काळ्या मंडळींत सावळा विठ्ठल पाहिलात. या तुमच्या कृष्णदृष्टीला मनोभावे वंदन ! --धनश्री लेले