-
Plague (प्लेग)
आजाराची साथ ही युद्धासारखी खवीस नाही. अशा परिस्थितीत चांगलं म्हणजे काय ? दैव म्हणजे काय ? मानव कुणाला म्हणायचं ? जेव्हा मृत्यू अनपेक्षित असतो तेव्हा त्याला सामोरं जाणं म्हणजे का वीरगती ? मृत्यूची वाट पाहणं म्हणजे का वीरगती? मृत्यूची वाट पाहणं हा विचार करत राहाणं, किंवा मृत्युमुखी पडणाऱ्या कुणाला मदत करणं, ही वीरगति ? मृत्यू हा अटळ आहे. पण जेव्हा सगळ्यांचं जीवनच धोक्यात आहे तेव्हा ह्या अटळपणाचं काय करायचं ? साथीच्या काळात नैसर्गिक मृत्यू येणं म्हणजे काय? आपण आज वाचलो ह्याची बढाई मारायची की ती आपल्याला काही करायची संधी मिळाली आहे असं मानायचं आणि काही करायचं ? ज्या साथीनं मानवी जीवनालाच धोक्यात टाकलंय ती साथच मानवी निष्काळजीपणाने येत असेल तर? म्हणजे ती कधी परत येईल ते सांगता येणार नाही. मग काय करायचं ? मानवाचे मानवाशी संबंध, मानवाचे देवाबरोबरचे संबंध, मानवाचे स्वतःबरोबरचे संबंध ! मृत्यू अटळ आहे हे एक सार्वत्रिक सत्य आहे. आणि ते तितकंच कठोर, आपल्या समोर उभं ठाकलेलं आहे. ते अदृश्य नाही. ते अटळ नाही. आपण अगोदरच मेलो नाही ह्याबद्दल हर्षोल्हास मानायचा की आपल्याला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग करायचा. हा काम्यूचा संदेश अत्यत सोप्या शब्दात, सर्वांना समजेल इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा काम्यूची हातखंडा कादंबरी, मराठीत थेट फ्रेंचमधून.
-
Paishachi Goshta (पैशाची गोष्ट)
पैसा आपल्याला भेडसावणारा प्रश्न किंवा आयुष्याचा आनंद लुटण्याच्या मार्गातला अडथळा बनू नये असं वाटत असेल तर... पैशाबद्दल स्पष्ट बोलायचं म्हटलं तर... ते काही सोपं नाही. खरंतर, पैसा म्हणजे इथून तिथून टाळण्याचाच विषय असतो. इतकच नव्हे, तर पैसा हा आपल्या जीवनातील एकमेव विषय नसला तरी, प्रमुख चिंतांपैकी एक विषय नक्कीच बनला आहे. आणि तसं पाहिल, तर पैसा हा स्वत:च, ना चांगला असतो ना वाईट असतो. तो आपल्याला बंदिस्त करून ठेवतो आहे की आपल्या स्वातंत्र्याची किल्ली बनतो आहे ह्या प्रश्नाचं उत्तर, आपले त्याच्याबरोबरचे संबंध कसे असतातं ह्यावर ठरत असतं. जर का पैशाबरोबरच्या आपल्या संबंधांची आपण पूर्णपणे जाणीव ठेवली आणि त्या संबंधाकडे पूर्णपणे लक्ष दिलं, तर आपण आपल्या वैयक्तिक संपत्तीबरोबर निकोप आणि सकारात्मक संबंध निर्माण करू शकतो; मग आपली मिळकत कितीही भरभक्कम असो किंवा कितीही तुटपुंजी असो. क्रिस्टिना बेनितो ह्या लेखिकेचं ह्या पुस्तकामागचं तत्त्वज्ञानच ते आहे. सारं आयुष्यभर त्यांनी अर्थशास्त्रज्ञ आणि वित्तीय सल्लागार म्हणून काम केले. पैशाबरोबरच्या आपल्या संबंधांच्या पूर्ण जाणिवेच्या तत्त्वांची आणि आपल्या आयुष्यातील चांगल्या सवयींची गाठ घालून, त्या एक आगळीवेगळी पद्धत सादर करत आहेत. तीन टप्प्यांत विभागलेल्या ह्या पद्धतीमार्फत आपल्याला आपल्या जवळची रक्कम अधिक चांगल्या रीतीने हाताळता येते, आपल्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो आणि काळज्यांचं आपल्या डोक्यावरचं ओझं हलकं करता येतं.