-
Nivdak AbhidhaNantar (निवडक अभिधानंतर)
अभिधा सुरू असताना ग्लोबलायझेशनची प्रक्रिया सुरू झाली होती. आमच्या काही कविता आणि याच दरम्यान स्वतःला आलेलं जगण्याचं नवं भान, ग्लोबलायझेशनमुळे बदललेला भोवताल आणि या सर्वांमुळे उमजलेले लिहिण्याचंही नवीन भान ह्या ‘अभिधा’मधून आम्ही दिलेल्या किंवा आम्ही मिळविलेल्या काही गोष्टी. १९९९ मध्ये अभिधानंतर सुरू केलं तेव्हा ग्लोबलायझेशनचा परिणाम असलेले साहित्य आम्ही प्रसिद्ध करू असे धोरण होते आणि २०१४ साली अभिधानंतर बंद करेपर्यंत आम्ही ते लावून धरले. ग्लोबलायझेशननंतर जीवनाप्रमाणे साहित्यही बदलत होतं. हा बदल पकडण्याचा, डॉक्युमेण्ट करण्याचा, नवीन साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश होता. हा अवकाश ग्लोबलायझेशन 'नंतर' चा आणि एका अर्थाने 'अभिधा' 'नंतरचा' अवकाश होता. या पुस्तकातून अभिधानानंतरमध्ये प्रकाशित झालेल्या निवडक कविता, लेख, मुलाखती आणि संपादकीय देत आहोत. या सर्व लिखाणांमधून ग्लोबलायझेशन आणि डिजिटालायझेशननंतर निरंतर बदलत असलेली भाषा, संस्कृती,आणि जगणं अधोरेखित होतं. मराठीत सध्या लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या, विचार करणाऱ्या, भाषेची आणि संस्कृतीची चिंता करणाऱ्या आणि भाषेसाठी झगडणाऱ्या लोकांसाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचा दस्तऐवज ठरू शकेल याची खात्री आहे.