-
Gudghyache Fecial (गुडघ्याचे फेशियल)
विनोदी कथांचा हा माझा पहिलाच कथासंग्रह. एकूण सोळा कथा या संग्रहात आहेत. या कथा विविध मासिकातून प्रकाशित झाल्या आहेत. “गुडघ्याचे फेशियल” ही कथा पहिल्या ऑनलाइन विश्व मराठी संमेलनात निवडली गेली होती. रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. जीवनात घडलेल्या तसेच न घडलेल्या प्रसंगांनाही कलात्मक रूप देत निखळ विनोदासाठी हे लेखन केले आहे. रसिकांनी त्याचा आस्वाद मोकळ्या मनाने घ्यावा ही अपेक्षा.