-
Aajobancha Diva Ani Etar Katha (आजोबांचा दिवा आणि
एका तरुण मुलाने दिवे विकायचा व्यवसाय सुरू केला. कोणाचीही मदत नाही. हाती पैसा नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीतपण त्या मुलाने चिकाटीने आपले काम सुरूच ठेवले. त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले. पण यश हे पटकन हातातून सटकून जाते. त्याच्या दिव्याच्या व्यवसायाला एका मोठ्या शत्रूबरोबर टक्कर द्यावी लागली. कोण होता तो शत्रू ? त्याच्या व्यवसायचे काय झाले ? गोन कोल्हयाचे झालेले मन परिवर्तन. त्याने केलेल्या परोपकाराचे त्याला काय फळ मिळाले? गोनगोरो घंटा म्हणजे खरे तर निर्जीव वस्तू. पण सर्व गावकऱ्यांचा तिच्यावर खूप जीव होता. तिला कसा निरोप दिला ? छोट्या तारोचे खरे दुःख काय होते? फुलपाखरे आणि काजवे ह्यांनी झाडाचा उत्सव कसा साजरा केला ? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आजोबांचा दिवा आणि इतर कथा ह्या पुस्तकामध्ये. निइमि नानकिचि ह्या प्रसिद्ध जपानी बालसाहित्यकारांच्या ह्या कथांमध्ये मानवी मनातील भावनांचे अचूक चित्रण आढळते. माणूस आणि त्याच्या भावना ह्या सर्वत्र सारख्याच असतात. त्यामुळे ह्या कथा वाचताना कथांमधल्या व्यक्ती आपल्याला जवळच्या वाटू लागतात. त्यांची सुख - दुःखे आपली वाटू लागतात. ह्या कथांमधून जपानच्या संस्कृतीची ओळख पण आपल्याला होते.