-
Veleche Parinamkarak Vyavasthapan (वेळेचे परिणामकारक व्यवस्थापन)
वेळ व्यवस्थापन म्हणजे तुमची व्यावसायिक आणि वैयक्तिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुमच्या वैयक्तिक वेळेचा कार्यक्षम आणि प्रभावी वापर होय. याचा अर्थ केवळ तुमच्या तातडीच्या कामांनाच नव्हे तर महत्त्वाच्या गोष्टींनाही प्राथान्य देणे. तुम्ही तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी दैनंदिन प्लॅनर आणि करायच्या कामांची यादी वापरू शकता. ही साधनं निश्चितच उपयुक्त आहेत; परंतु ती महत्त्वाची कामे आणि तातडीची कामं कोणती यातला फरक स्पष्ट करत नाहीत. महत्त्वाच्या उपक्रमांचा एक परिणाम असतो ज्यामुळे तुमची उद्दिष्टे साध्य होतात. तातडीच्या उपक्रमांकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असते. आणि बऱ्याचदा ते उपक्रम इतरांची उद्दिष्टे पूर्ण करण्याशी संबंधित असतात. लक्षात ठेवा, की विलंब हा प्रभावी वेळ व्यवस्थापनाचा सर्वात मोठा शत्रू आहे. गोष्टी लांबवल्याने किंवा टाळल्याने, तुमच्या कामाचा ढीग होत राहील / तुमचे काम साचून राहील. प्रभावी वेळ व्यवस्थापनामुळे तुम्हाला खालील फायदे मिळू शकतात. प्राधान्यक्रम ठरवून, तुम्ही वेळखाऊ आणि अनावश्यक उपक्रम वगळ शकता. एकाच वेळी अनेक कामं हाताळण्यापेक्षा तुम्ही दररोज असलेल्य कामाचे योग्य व्यवस्थापन करू शकता. तुमच्या कामांच्या दैनंदिन प्रगतीचं तुम्ही अवलोकन करू शकता. या पुस्तकात 'वेळ' या मौल्यवान साधनाचा उपयोग आणि व्यवस्थाप अधिक चांगल्या रीतीने करण्याचे उपाय सांगितलेले आहेत.
-
Draupadi Kuruvansh Pravesh Part 1 (द्रौपदी कुरुवंश
द्रौपदीची आई, महाराणी प्रीश्ती, मानवी हक्कांची पुरस्कर्ती आणि एक चतुर राजकारणी म्हणून ओळखली जात असे. आपल्या मुलीच्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि तिला खंबीर बनवण्यात महाराणींचा मोठा वाटा होता. अशा स्वतंत्र विचारांच्या राजकन्येने, माँ कुंतींनी चुकून सांगितलेली गोष्ट आंधळेपणाने कशी ऐकली असती? सर्व पांडव तिच्याशी लगेचच विवाहबद्ध होण्यास तयार झाले का? बुद्धिमान सहदेव आणि दूरदृष्टी असलेली द्रौपदी यांनी एकत्रितपणे विभाजनासाठी युक्तिवाद केला, त्याचा परिणाम म्हणून दुर्योधन हस्तिनापुराच्या सिंहासनावर कायदेशीररीत्या बसू शकला का? खुल्या आणि मुक्त विवाहाची गुंतागुंत (बहुपतित्व), सत्तेचा आणि राजकारणाचा अनाठायी प्रयत्न, असामान्य आणि विलक्षण मैत्री, सर्वसमावेशकता आणि लिंग-समानतेला सक्रियपणे प्रोत्साहन देणाऱ्या भावंडांचे एकमेकांशी असलेले बंध, अशा अनेक गोष्टी उलगडून दाखवणारी प्राचीन महाकाव्याची ही कालातीत कथा आहे. पाच भागांत उलगडत जाणाऱ्या, एका साम्राज्ञीचा जीवनपट कथेच्या रूपात सादर केलेला आहे.